STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Others

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

1 min
365

वैशाख महिन्याच्या तृतीयेला "अक्षय तृतीया" हा सण,

साडेतीन मुहुर्तांपैकी एका मुहूर्ताचा त्यास मान |

याच दिनी पितरांना जेवू घालण्याची हो प्रथा,

अति शुभ दिन हा पुढे मांडते याची कथा ||

श्रीकृष्ण हा जणू पांडवांचा पाठीराखा,

एक दिनी पाठोपाठ गंगेवर जाये सखा |

भर उन्हाची ती वेळ गेले मंदिरी आश्रयास,

चालू झाल्या गप्पा टप्पा होते सखेच ते खास ||

शुरविर राजा धर्मराज मंदिरी आले त्या क्षणास,

चिरकाल टिकवाया पुण्य उपाय सांगा? म्हणू लागे श्रीकृष्णास |

स्मित करूनी श्रीकृष्ण सांगू लागे मग त्यास,

वैशाख शुद्ध तृतीयेला दानधर्म करावे,"स्मरावे पूर्वजांस" ||

"केलेले दानधर्म चिरंतर टिके म्हणून "अक्षय तृतीया" नाव पडले या दिनास"


Rate this content
Log in