STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

अखंडीत कल्याणकारी

अखंडीत कल्याणकारी

1 min
232

रंगले शिवार जागोजागी, वसंतोत्सव न पाहणारा अभागी

अभागी म्हणून त्याच्यावर उमटला ठसा

ठसा सांजवेळी तो सूर्य क्षितिजावरी

क्षितिजावरी सूर्यदेव बघ गेला कसा?....१


कसा ओळखावा रंगाने माखलेला चेहरा

चेहरा कठीण असते ओळखणे होळीच्या रंगाचा

रंगाचा बेरंग करू नका होळीला

होळीला नैवेद्य तो पुरणाचा.....२


पुरणाचा गोडा धोडाचा प्रसाद खाऊनी

खाऊनी तृप्त झाला जीव सर्वांचा

सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला

झाला गोंधळ सारा रंगपंचमीला लोकांचा.....३


लोकांचा गोंधळ पाहून आले तिथे पुलीस

पुलीस घेऊन गेली नशा केलेल्या लोकांना

लोकांना नशेमुळे काहीच कळले नाही

नाही पाहिले पुलिसांनी तेथे चोरांना......४


चोरांना चांगलेच फावले करायला चोरी

चोरी करून चोर पसार झाले तिथून

तिथून आली एक मोठी पुलीस गाडी

गाडी घेऊन गेली या चोरांना इथून.....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन