STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

अजूनही माझ्यात

अजूनही माझ्यात

1 min
328

अजूनही दुःख सोसण्याचे 

माझ्यांत काळीज आहे

अजुनही लढण्याची येथे माझ्यात माज आहे


मी लढणे सोडणार 

नाही येथे जिंकेपर्यंत 

माझेच हे माझ्याशी

युद्ध आज आहे

अजुनही लढण्याची येथे माझ्यात माज आहे 


मी पाहिलेली स्वप्ने 

का मोडली उजेडात

होईल कधी तरी प्रकाश 

काय झाले आता संज आहे

अजुनही लडण्याची येथे माझ्यात माज आहे 


मी शोधित आहे मार्ग

येथे दरी खोऱ्यात

मी पडलो म्हणून मला 

नाही कसलीच लाज आहे

अजुनही लढण्याची येथे माझ्यात माज आहे


पडले येथे किती तरी 

मला पाडण्यात

माझ्या यशाचे, श्रमात 

लपले राज आहे 

अजुनही लढण्याची येथे माझ्यात माज आहे

 

नाही मी एकटा यथे 

सर्वाच्या दुराव्यात

त्यांन वर माझ्या

पडली गाज आहे

अजुनही लढण्याची येथे माझ्यात माज आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन