STORYMIRROR

Chakradhar Thakre

Others

3  

Chakradhar Thakre

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
302

आयुष्यभर सोबत असून

जवळ कधी बसत नाही,

एका शाळेत असून आम्ही

एकमेकांस दिसतं नाही.

हरवला तो एकमेकांचा

जिव्हाळा आणि प्रेम,

आपसांत दोष देऊन

नित्य चाले आपला वादविवाद.

धाव धाव धावत आहे

प्रेमाचा रस्ता दिसत नाही,

हृदयाचे पाऊल कधी

प्रेमाकडे वळत नाही.

इथक सोबत असून पण

असल्यासारखं वाटत नाही,

जगतो आहोत कशासाठी

ते काहीच कळत नाही .

येईल क्षण असा

घेऊन जाईल श्वास,

अर्ध्यावरच थांबवेल

जीवनाचा प्रवास .

अजूनही ती जवळ आहे

जगावस वाटत आहे,

तिच्या सोबत जगणे हे

सुंदर डोळ्यांनी पाहायचे आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन