आयुर्वेदिक खजिना ब्राह ब्राह्मी
आयुर्वेदिक खजिना ब्राह ब्राह्मी


मंडुकपर्णी व नीरब्राह्मी
अशी आहेत दोन नांवे
निरोगी आयुष्य जगाया
उपयुक्त असे ठावे......!!
अर्धांगवायुचा जर कोणाला
असेल खूप त्रास
ब्राह्मीचे रस प्राशन करावे
फरक पडेल हमखास.....!!
मज्जातंतू वर कार्य करते
उपयुक्त व मिळे मनःशांती
निद्रानाश दूर करते पटकन
वाढते बुध्दी व स्मरणशक्ती...!!
मज्जातंतूचे पोषण करत
मिळते मेंदूस पुष्टी
मूल्यवान व शक्तीवर्धक
चांगली राहते शरीरयष्टी....!!
फीट येणे,चक्कर येणे
आजारांवर करी मात
गतिमंद व मतीमंद मुलांच्या
प्रकृतीत देते साथ.......!!
वमन व रेचकगुण असती
कफ सारा बाहेर पडतो
पित्तशमनासाठी रस प्या
मुतखडा सुध्दा दूर होतो.....!!
ह्रदयासाठी शक्तीवर्धक
केसांसाठी फारच पोषक
उदासिनता दूर करी
सर्दी ,खोकल्याचा शोषक...!!
आयुर्वेदाचे महत्त्व जाणा
गोळ्यां,औषधी दूर करा
आयुष्य तुमचे वाढेल आपसुकच
त्यासाठी आयुर्वेदिक खजिना धरा.....!!