आठवणींची पाखरं (विद्यार्थी)
आठवणींची पाखरं (विद्यार्थी)
1 min
11.8K
आठवणींची पाखरं
येतील का परतून?
कधी उघडतील शाळा
होईल आनंद भेटून.....!!
ज्ञानाची भूक आता
घरातच पुरवूया
सारे मिळून आपण
कोरोनाला हरवूया....!!
चिमण्यांचा चिवचिवाट
ऐकायला येत नाही
किती दिवस झाले
पाखरांची माझ्या भेट नाही...!!
अस्वस्थ होतं मन
शाळेची आठवण आल्यावर
भरून येत मन नेहमी
मनी भावना दाटल्यावर....!!
कधी जाईल महामारी
केव्हा येतील पुर्वीचे दिवस
आठवणींचे पाखरं माझी
यावे परतूनी ते दिवस.....!!
