आत्मशक्ती
आत्मशक्ती
आनंदाने जगण्यासाठी
मज्जामस्ती हवीच असते,
तिच्यात रंगत भरण्याकरिता
जीवलगांची इथे गरज भासते
गप्पाटप्पा, सिनेमा पाहणे
खेळ खेळणे, भ्रमंती करणे,
आनंद प्राप्तीचे मार्ग अनेक
हेतू दुःखाला दूर सारणे
आयुष्याच्या वाटेवरती
संकटे अनेक वाट अडविती,
कधी कधी अनेकांना तर ती
नकळत यमसदनाला नेती
परंतु अशा या कठीण समयी
मनोबल आपले खचू न द्यावे,
दुःखी अशा या घटनांनाही
सुखाच्या चष्म्यातूनी पहावे
आत्मशक्तीला जागे करूनी
अशक्यालाही शक्य करावे,
सुंदर अशा या पृथ्वीतलावर
जगण्याआधी कधी न मरावे...
