STORYMIRROR

Amol Shinde

Others

4  

Amol Shinde

Others

आपला माणूस

आपला माणूस

1 min
555

या नात्यात ना त्या नात्यात

भेटत नाही आपला माणूस

दुःखांच्या गर्तेत असतो आपण

तेव्हा खेटत नाही आपला माणूस


लाख दुश्मन असले जरी

रेटत नाही आपला माणूस

बाजूला रहदारी रोज असते

तरी बोलत नाही आपला माणूस


गोतावळा जमा होतो माणुसकीचा

मिसळत नाही आपला माणूस

एकच रंग आहे रक्ताला आपल्या

समजत नाही आपला माणूस


जेव्हा जातीवरून भांडणं होतात 

तेव्हा कळत नाही आपला माणूस

एखादा शेतकरी फास घेतो वेशीवर

पाहून का पळत नाही आपला माणूस


वाटण्या आईबापाच्या एक दिवस

जुळवत का नाही आपला माणूस

कळलं नाही कधीच मी कोणत्या धर्माचा

माणुसकी धर्म टाळत असतो आपला माणूस


खांदे देणारे तिरडीला माझ्या दुसरेच

का खांदा देत नाही आपला माणूस

लक्ष असू द्या जरासं माझ्यावरही

वर गेल्यावर परतत नाही आपला माणूस


हं बस्स झाल्या बढाया अमोल तुझ्या

आता हातही मिळवत नाही आपला माणूस

तिरस्कारीत वृत्ती समाजात वावरते

इथेच संपत असतो आपला माणूस


Rate this content
Log in