Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Others

4.0  

Shobha Wagle

Others

आम्ही तिघी

आम्ही तिघी

1 min
11.8K


मस्तीतले दिवस ते शाळेतले

आजही आठवतात मजला

रम्य ती मैत्री आम्हा तिघींची

सुखद काळ तो मनी भरला


कॉलेज शिक्षण, नोकरी धंदा केला

संसाऱ्याच्या गाड्यात गुरफटलो

भेट दुर्मीळ होऊ लागली मैत्रिणींची

विसरुनी तया मुला-बाळात रमलो


जुजबी भेट ती व्हायची आम्हा तिघींची

आला पुन्हा मैत्रिचा उमाळा निवृत्तीनंतर

उतारवयात चाखू लागलो गोडवा मैत्रीचा

दोन्ही माझ्या सखीत मी ठेवणार नाही अंतर


Rate this content
Log in