STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
2.9K

आम्ही सावित्रीच्या लेकी

घेऊ   उत्तुंग   भरारी

तुझे  ज्ञानामृत   पिऊ

ठेवू  बाणाही   करारी.......!!


आम्ही सावित्रीच्या लेकी

आता  धैर्याने  हो  लढू

कुणी  शिकार  करता

त्याचा  मुडदाच   पाडू.......!!


तंत्रज्ञान    सोबतीला

झेप  अवकाशी   घेवू

तुझा  लावलेला   वेलू

वर    गगणाला   नेवू......!!


राजकारणात   जाऊ

ठेवू  पाय गं   यानात

वेळप्रसंगीही    काढू

तलवारी गं   म्यानात......!!


माझी जिजाऊ, सावित्री

घेवू   तुमचे   आदर्श

सर्व  मुली  गं शिकल्या

आज होतो आम्हां हर्ष.....!!


तुझ्या  धाडसाचे  साऊ

किती  गुणगान   गाऊ

तुझ्या  विचारांची  गुट्टी

आम्ही पाजत गं  जाऊ......!!


माय  सावित्री  माऊली

पती  ज्योतीबा  गं  थोर

तुम्हांमुळे  शिकली गं

बहुजनांचीही   पोरं.........!!


काय  पुण्याई  आमची

आम्ही सावित्रीच्या लेकी

ठेवू   धडात    हिंमत

चालू  मार्गावर  नेकी.......!!



Rate this content
Log in