STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

आला श्रावण

आला श्रावण

1 min
261

आला श्रावण महिना

झाले डोंगर हिरवे

रान,तरू,पशू-पक्षी

आनंदले वेलीसवे.....!!


मनी हर्ष दाटलासे

मन होतसे पाऊस

सण येती मागोमाग

फिटे मनाची हाऊस...!!


रानभाज्या डुले रान

रान गवताची पाती

भाऊ बहिणीचा सण

ठेवतसे घट्ट नाती....!!


बंधु येई भेटायला

राखी पौर्णिमेचा सण

एका धाग्यात जुळती

भावा बहिणीचे मन....!!


आला श्रावण श्रावण

येई नागपंचमीचा सण

रिमझिम पावसात

किती आनंदले मन....!!


पिक डोलतया रानी

हिरवीगार ती शेती

प्राणाहुनी प्रिय वाटे

मज गावातील माती...!!


आले दाटून रे ढग

मना भुलवी गारवा

हवाहवासा रे वाटे

ॠतू हिरवा हिरवा....!!


Rate this content
Log in