आला पहिला पाऊस
आला पहिला पाऊस
1 min
173
आला पहिला पाऊस
रान ओलेचिंब झाले
रानवेली पशूपक्षी
भिजवून सारे गेले...!!
ओल्या मातीचा सुगंध
पसरला दरवळ
मनी प्रसन्न वाटेल
आता येई हिरवळ.....!!
ओल मातीच्या ढेकळी
बळीराजा सुखावला
ये रे ये रे पावसा तू
जणू विठ्ठल पावला.....!!
रानवेली सुकलेल्या
आता फुटतील पानं
ओल झाली रानोवनी
येई मुखातून गाणं.......!!
निसर्गाचं दान देवा
आला पहिला पाऊस
पिकू दे हे रान सारं
तवा फिटेल हाऊस....!!
