आला आला पाऊस
आला आला पाऊस
1 min
200
आला आला पाऊस
गावू किती गुणगान
डोळे भरून बघावे
हिरवे हिरवे रान
आला आला पाऊस
आले आनंदाला उधाण
शेतमळे फुलले
झाले लई समाधान
आला आला पाऊस
ओली झाली माती
बिज अंकुरे अंकुरे
जसे सोनेरी मोती
आला आला पाऊस
सुगंध आला मातीला
दाणेदार कणीस
थुईथुई नाचला
आला आला पाऊस
पाखरे सैरभैर झाली
मैना सुरात गावून
शेतमळे लाडात फुलली
