STORYMIRROR

Amol Shinde

Others

4  

Amol Shinde

Others

आजवर इथे

आजवर इथे

1 min
540

*शीर्षक.आजवर इथे*


कोणास ही कळलो ना मी आजवर इथे

पांघरून सुखाचे जखमी हृदयावर इथे


जागा ना मिळाली सरण माझे रचण्यास

छिडकले अत्तर का दुष्मणाने त्यावर इथे


आडवा ना आलो वाटेत मी कोणाच्याही

तुझ्याच मुळे सारे माझ्या मागावर इथे


तू होतीस अशी बलाढ्य पैशावाल्याची

तळवे चाटणाऱ्यांचीच होती पावर इथे


अर्ध मेला झालो जरी असा मी तुझ्यामुळे

खोलवर रुजलेले कळले नाही भंवर इथे


एक कळून चुकलं जिंदगीला प्रेमात या

प्रियकराला नसते मालमत्ता स्थावर इथे


मला आज गरिबी नडली माझीच आता

प्रेमासाठी कर्ज काढू मी कशावर इथे


Rate this content
Log in