STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

आई

आई

1 min
227

आई हे मायेच गाव असतं 

तिच्यामुळेच आपल्याला 

मिळालेल नाव असतं 


आई असते आनंदाचा पेला 

प्रेमाने ओतप्रोत भरलेला

सर्वाच्या गरजा भागवुन 

अर्धा तसाच उरलेला


घराचे घरपण असते आई 

संस्काराच्या मंदिराचा असते कळस 

चांगल्या वाईटाची जाण असणारी 

आई असते अंगणातील तुळस


आई पंढरपूरची विठु माऊली 

तशी तुकोबारायाची अंभगवाणी 

तहानलेल्या शिणलेल्या जीवाला 

आई असते वाळवंटातील पाणी


आई असत एक गजबजलेल घर

निनादत असते आरतीची टाळी 

चटका बसतो जेव्हा जीवाला 

आईच्या नावाची पहिली आरोळी


आई असते ऊन पावसाचे छत 

प्रेमळ जिव्हाळ्याची असते सावली 

कठोर शब्द ओठावर मृदु ह्दय 

मायबाप एक विसावा अशी माऊली


आईच्या कष्टाच नसतं मोजमाप 

लेकराच्या सुखासाठी झिजवते काया 

कळा सोसुन जोजविती पाळणा 

साक्षात परमेश्वराची असते छाया 


आईच रुप असच असत 

ते फक्त लेकरालाच दिसतं 

आई हे मायेच गाव असत 

तिच्यामुळेच आपल्याला 

मिळालेलं नाव असतं 


Rate this content
Log in