STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Others

आई

आई

1 min
221

बालपणी आई मला 

शिकविले चालण्यास |

दिले धडे संस्काराचे

सज्जनच  बनण्यास ||१||


कधी रागावत होती

कधी लावलेस लळा |

तुझ्या मायेच्या हाताने 

मिटे थकवा सगळा ||२||


होतो मी निराश जेव्हा 

आई तुच होती आशा |

माझ्या उज्वल भाग्याची 

तुच मोठी अभिलाषा ||३||


माझ्या विकासात आई 

तुझे राहते आशिष |

येई आठवण  तुझी

तेव्हा झुके माझे शिष ||४||


आज मातृदिनी आई

मन  माझे  तरसले |

नकळत  डोळ्यातून

खूप  अश्रू  बरसले ||५||

________________________________


Rate this content
Log in