STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

आई आईच असते...

आई आईच असते...

1 min
254

आई आईच असते,प्रेम ह्रदयी वसते

लेकरांसाठीच आई,सारे कष्ट उपसते.....!!


नऊ महिने पोटात,रोज बाळाला पोसते

जन्मावेळी आई किती, मृत्यूयातना सोसते...!!


आईची अगाध माया,नित्य मनास भासते

लेकराच्या सुखासाठी, दुःख आईच सोसते...!!


जिव लेकरात तिचा,सुख देवाला मागते

लेकराच्या सेवेसाठी,रातरात हो जागते....!!


बाळं झाला जरी मोठा,आई कडेवर घेते

सानुल्या छकुल्यासाठी,आई पळतच येते...!!


हिरकणी जशी गेली,गड व कडा चढून

काळजीपोटी बाळाच्या, येते मृत्यूशी लढून...!!


हाडाची काडं करते,लेकराच्या भल्यासाठी

जीव मारून जगते, बांधी पदराला गाठी....!!


देव भुकेला आईचा,येतो आईच्या भेटीला

आत्म्यात तिच्या वास, निरंतर सेवा केला...!!


बाळं तीचा जीव आहे,लेकराची तिला माया

नका विसरू मायबापा,लाभो आईचीच छाया...!!


नाही उसनी भेटते,आईसारखे ना प्रेम

आई आईच असते, त्यानंतर बहीण सेम...!!



Rate this content
Log in