STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

4  

गोविंद ठोंबरे

Tragedy

दशा

दशा

1 min
547

घामाच्या सुगंधाने तो बरबटलेला...

या घाम सुगंधाचं जणू काही वेडच त्याला

वेदना त्याला नवीन नसाव्या

तरीही मलमपट्टीच्या आशेवर तो बसला नव्हता..

डोक्यावर छप्परही नसताना

ठिगळाचं गाठोडं असताना

हातावर घट्टे पडलेलं पीक घट्ट मुठीत आवळून तो त्यांना जपत फिरायचा...

मेलेल्या बापाला सरणावर आहुती द्यायला

मायच्या कुकाचं शिंपण करायला

त्याच्याजवळ होता गावाबाहेर उसनवारीवर मिळालेला मसनवटा...

बायकोच्या गळ्यातली काळी पोत

शेंबड्या पोराचं फाटकं दप्तर

अन लेकीच्या काळवंडलेल्या तोंडाव्यतिरिक्त त्याच्याजवळ नसावं काही...

तरीही तो बेईमान झाला नाही

मजुरीशिवाय कधी म्हणून कोणाच्या दारात वाकला नाही

लबाडीच्या पानाचा रंग जिभेवर रंगवला नाही...

तरीही त्याला लाचार होताना गाव चौकात पाहिलं

कोणाच्या तरी पायावर लोटांगण घेताना

लाथ-बुक्क्यांनी टाळकं शेकताना...

का कुणास ठाऊक त्यानं कुठं इमानदारी दाखवली?



Rate this content
Log in

More english poem from गोविंद ठोंबरे

Similar english poem from Tragedy