Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

#StoryMirror College Writing Challenge Season 3

SEE WINNERS

Share with friends

परिचय : 

आपल्या हातातील कागद तुमच्या हृदयाच्या श्वासोच्छ्वासाने भरा.

- विल्यम वर्डस्वर्थ

अन्न, निवारा आणि साहचर्यानंतर कथा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील सर्वात मौल्यवान भाग आहे. चला तर मग लिहायला सुरुवात करा, काय, हा मुद्दा नाहीच!!! युवकांनी सांगितलेल्या शक्तीशाली कथांचा राष्ट्राच्या भवितव्यावर नक्कीच सुपरिणाम होऊ शकतो.

म्हणूनच, आपले जग सर्वांनाच राहण्यासाठी अधिक चांगले करण्यासाठी आणि लाखो लोकांना प्रभावित करण्यासाठी स्टोरीमिरर सादर करत आहे, जगातील सर्वात मोठी ऑनलाईन लेखन आव्हान स्पर्धा-स्टोरीमिरर कॉलेज राईटिंग चॅलेंज (एससीडब्ल्यूसी - संस्करण 3).

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अधिक व्यापक करणे, प्रोत्साहन देणे व लिखाण तथा वाचनाकडे त्यांचा अधिकाधीक कल वाढावा यासाठी मदत करणे, हे आव्हान आहे. आपल्या अंतःकरणातील विचारांना कागदावर उतरवण्यातून युवकांना नवी दृष्टी, नवे ध्येय मिळू शकते. प्रत्येक लेखकामध्ये इतरांच्या विचारांना आकार देण्याची आणि त्यांना घडवण्याची ताकद असते. आपले शब्द वापरुन लेखक वाचकाला जसे जग पाहायला आवडते, तसे दाखवू शकतो.

चला तर मग, तुमचे विचार कागदावर लिहायला घ्या, तुमच्या शब्दांनी/आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करा.

साहित्य रचना प्रकार:

कथा

कविता

कोट्स

ऑडिओ कथा

ऑडिओ कविता

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य रचना सादर केली जाऊ शकते.

कालावधी:

स्पर्धा कालावधी - 5 जानेवारी 2021 ते 15 मार्च 2021

एसएम लिट मास्टर्स पुरस्काराची दुसरी फेरी नंतर जाहीर केली जाईल

मतदानाचा कालावधी - 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021

निकाल - जुलै 2021 

अभिप्राय आणि प्रश्नांसाठी -

ईमेल :  sswc@storymirror.com

दूरध्वनी क्रमांक: 022-49240082 / 022-49243888 / 9372458287 (सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप: +91 84528 04735

To know more about categories, prizes and rules, click here - https://assets.storymirror.com/media/storymirror/website-assets/sm-static-pages/static_files/62f1d90e-99e3-44f6-9958-2420095da659.pdf


Trending content
66 369

62 280