Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Children

3  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Children

भीम आणि जेरी

भीम आणि जेरी

3 mins
210


ढोलकपूर राज्यात उंदरांनी हेदोस घातला होता अन्न धान्याची नासाडी होत होती सगळे लोक कंटाळलेले आपली व्यथा राज्यच्या राजा समोर मांडावी असे ठरवून सगळे राज दरबारी पोहचले लोकांच्या मुखिया ने राजा समोर आपली व्यथा ऐकवण्यास सुरवात केली. 

"महाराजा काही दिवसापासून उंदराचा हेदोस चालू आहे अन्न धान्याची नासाडी होत आहे खूप उपाय केले पण काही फायदा झाला नाही व्यापार ठप्प झाला आहे उपासमारीची वेळ आली आहे "

"काळजी नसावी माझ्या कानावर आली आहे हि गोष्ट उपासमारीची वेळ येणार नाही उंदराचा बंदोबस्त लवकरात लवकर होईल तुम्ही काळजी करू नका "

राजाच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन सगळी परतीची वाट धरतात 

"महाराजा हे उंदीर साधे सुधे नाही आहेत ह्यावर उपाय कसा निघेल "

"चिंता नसावी मंत्री आपला भीम आहे ना भीमाला बोलवण्यात यावे "

"नमस्कार महाराजा मला बोलवले "

"भीम राज्यात काय झालंय हे माहित असेल ना तुला"? 

"हो महाराज सध्या उंदराचा हा महत्वाचा प्रश्न आहे "

"हो ह्यावर उपाय काय असू शकतो भीम "

"महाराजा ह्या उंदरांनी टुणटुण मावशीच्या लाडवांची पण वाट लावली सगळी नासाडी केली "

"भीम ह्यावर उपाय काय ?"

"महाराज काळजी नसावी उंदराचा बंदोबस्त नक्कीच होईल "

"भीम काम फते कर माझ्या शुभेच्छा तुच्या बरोबर आहेत "

"होय महाराज येतो "

"कसे करावे असे म्हणतात लोखंड लोखंडाचा घात करत मला माझ्या जेरी ह्या मित्राची मदत ह्याला हवी "

"हॅलो जेरी "

"हा भीम बोल" 

"जेरी मला तूंचि मदत हवी आहे तू डोलकपूर मध्ये येऊ शकतोस" 

"हो मित्र मी पोहोचेन "

जेरी च्या म्हण्यानुसार तो डोलकपूर मध्ये येतो भीम त्याला सगळी परिस्थिती समजवतो 

"अशी आहे तर परिस्थती भीम आपल्याला त्याचे घर शोधावे लागणार कुठल्या बिळातून येतात ते पाहावे लागणार "

"पण ते कसे कळणार "

"हो "

"जेरी आपण आज नजर ठेऊया टुणटुण मावशी च्या लाडूच्या दुकानात बसून टुणटुण मावशीला आज मस्त पैकी लाडू करायला सांगतो "

भीमाच्या म्हण्यानुसार तुपातले लाडू तयार होतात दुकानाच्या मध्य टेबलावर ते ठेवले जातात लाडवाचा वास एवढा पसरला केला कि सार वातावरण लाडूमय झालं होत 

जेरी लाडवाच्या शेजारी बसतो भीम मात्र लपून पाहत असतो आता ते त्या उंदराची वाट पाहत होते 

"काय वास येत आहे मित्रा वाटत आज मस्त लाडवावर ताव मारायला मिळणार "

"हो रे ह्या वासाने माझे जणू मन नाचू लागले "

"तुम्ही फक्त बोलण्यात वेळ घालू नका चला आक्रमण करूया"

 आणि उंदराची सात जणांची टीम आत शिरते टेबल वर ठेवलेल्या लाडवावर तुटून पडता 

"अरे हा कोण आपल्यातला वाटतो "

"काय रे कोण आहेस? तू उठ इथून निघून जा "

"मी जेरी आणि हे लाडू माझे आहेत" 

"तुझे हे हि आमची एरिया आहे तू कुठून आलास रे "?

"मी डोलकपूरचा राजेशाही उंदीर आहे त्या,त्यामुळे हि एरिया माझी आहे "

"राजेशाही उंदीर" 

"हो "

"तू अशील रे राजेशाही आमच्या वाटेला येऊ नकोस "

"मी कुठे आलो तुमीच तर इथे आलात "

"हे बघ आम्हला हे लाडू खाऊ दे "

"वाह लाडू माझे आणि मी तुम्हाला द्याचे "

"हे बघ तू आम्हला ओळ्खत नाहीत "

"मी कशाला तुम्हला ओळखू 

"हे बघ उगीच डोक्यात जाऊ नकोस "

"राजे शाही उंदराची अशी वागणूक करताना तुम्हला कसं वाटत नाही तुम्हाला तर दंड मिळाला हवा "

"तू कोण "

"अरे भीम सेनापती या पहा राजे शाही उंदराला हे साधे उंदीर काय म्हणतात ते "

"उंदीर महाराज दंड द्या त्याना "

"दंड" "

"हो दंड "

"उंदीर महाराज आमच्या टॉम मांजराला बोलूवुया हाच दंड चांगला आहे "

"माफ करा उंदीर महाराज आम्हाला दंड नको देऊ "

"मग काय करू" 

"आम्हाला जाऊ द्या "

"बरं बरं मग हे राज्य सोडून जा नाहीतर दंड भोगा "

"बरोबर आहे भीम सेनापती "

"नको महाराज आम्ही निघून जातो कायमचे चला रे उगीच जीव गमवावा लागेल "

आणि उंदरांनी धूम ठोकली 

"वाह महाराजा "

"वाह भीम सेनापती "

आपली युक्ती सफल झाली मित्रा 

"चल आता हे लाडू फस्त करू काय जेरी "

"मला जास्त हवे हा "

"हो का "

दोघांनी मिळून राजाकडून शाबासकी मिळवली आणि जेरीला ढोलकापूरचा विशेष अतिथी चे स्थान मिळाले.


Rate this content
Log in