Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Others

4.7  

Gautam Jagtap

Others

माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो

माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो

3 mins
708


गर्वाने ऊर भरून येतं की आपण भारताचे नागरिक आहोत जर आपणास आपल्या देशाचा अभिमान वाटतो तर लेखणी हातात घेऊन भारतात उज्वल भवितव्याच स्वप्न एका पानात सर सर लिहून मोकळा होणार कोण? मला वाटतं भारत हा सगळ्यांचा प्राणप्रिय देश आहे. त्यात सर्व भारतवासी सारखे नसतात ,प्रत्येकात वेगवेगळे ,गुण सामावलेले असतात. प्रत्येकाच्या मनात विचार वेगवेगळे येत असतात. कोणी आत्महत्येचा विचार करत असतो, कोणी भला व्यक्ती जगायचं कसं हा विचार करत असतो. विचार असंख्य पटीने आपल्या डोक्यात भार बनत असतात. देशाची खरी प्रगती बघायची असेल तर कुठे बघायची गरज नसते. किंवा कुठल्या भाग्यशाली ची गरज पडत नाही ,एवढेच आहे की देशाची समर्पित भावना त्याग आहे सर्वच गोष्टीचा त्याग केल्या शिवाय राग ,द्वेष ,मद, मत्सर, होणार नाही त्याशिवाय कुठला ''भ्रष्टनीतीचा" कारभार चालणार नाही हा महत्वाचा मुद्दा आहे.


 सत्सेवा हीच देशसेवा जर का सत्याच्या मार्गाने आपण देश सेवा केली तर कुठलीही मान हानी आपल्या देशात होणार नाही ही महत्वाची खबरदारी लक्षात ठेवा तरच प्रगती जर का वाम मार्गाने देश सेवा केली तर समजा मग "आपला देश काळ्याबाजारात हिरवी नोट छापत आहे" आणि गरीब दुबळ्यांचा डोळ्यात लाल मिरचीचा भपका,मारला जात. आहे हलाल होऊन मरतात पण त्याच्याकडे कोणी डोकावून हि पाहत नाही जर असंच चालू राहिलं तर आपल्या देशात काय होईल बस काही नाही सिगारेटच्या जळत्या टोकासारखे विझुन जाईल. हा सर्व अंधकारमय खेळ केव्हा संपेल, संपेल जेव्हा ताकदीचा कोणी सवालच पैदा करत नाहि तेव्हा संपेल हा खेळ ज्यात स्पर्धात्मक शर्यतीत धडपड करणारे भारत देशाचे युवक-युवती आपल्या कार्यशील निस्वार्थ भावनेने समर्पित होऊन उज्वल भविष्याचं उंच शिखर गाठत आहे.

      गर्व हा मजला

   तु देशसेवेसाठी झिजला

   हा मजला अभिमान आहे.

 पुन्हा पुन्हा कर्तव्याने खुणावत मजला 

  

  हे देशासाठी हित मी जपणार सदैव प्रयत्नांचा सिद्धांत मांडणार युवक-युवतींचा देश भारत देश आहे सारे एकता समानतेच्या भावनेने सर्व एकत्र मिळू या ही चांगली गोष्ट आहे. सद्यस्थितीला प्रत्यक्षात उतरवली पाहिजे, पण मनावर घेणार कोणी युवक युवती नाही का या देशात? हो आहेत पण कारणे खूप आहेत. सेवाभावी वृत्तीची अंगात नखभर ही बळ नाही लहानातुन मोठे कार्य करण्याची जिज्ञासा वृत्ती नाही असं का .. बरं जास्त वेळ आपण समाजकार्यासाठी देत नाही राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा आपण जराही विचार करत नाही. असं का? कारण आपले लक्ष एकात्मतेच्या केंद्रबिंदू कडे वळत नाही. आणि राष्ट्र कार्याच्या शिखर स्थानाला थरकाप करतो. परिणाम काय आपला वेळ आणि ऊर्जा नकारात्मक गोष्टी कडे धाव घेत आहे. आणि वेळेला महत्व आपण ज्या गोष्टी कडे दिले पाहिजे तो देत नाही ,आपण वायफळ गोष्टींकडे जास्त लक्ष देत असतो. आणि वायफळ ऊर्जा घालवत असतो. हा आपला असाच नित्य कालक्रम असल्यावर आपण भारत देशाचे विश्वविजेते कसे होणार??? आपल्यातली राष्ट्रभावना कशी जागी होणार या देशाला खरी गरज आहे विवेक बुद्धी ची मन बुद्धीचा विकास करण्याची देश हिताच्या गोष्टी लक्षात आण्याची धाडसीवृत्ती आपण आतून निर्माण केली पाहिजे.  जर का आपण एखादे लहान रोपटे एका जागेवर लावली त्याला वाढवण्यासाठी आपण खत देत असतो आवश्यक नुसार नित्यनेमाने पाणी टाकत असतो हा आपला नित्य अनुभव. जेव्हा तो वाढू लागतो तेव्हा खूप काही आपण मिळवलं असं वाटतं तशीच ही देश कार्याची भावना आपल्या नसानसात जागली पाहीजे. देश सेवेचं बीज आपल्या मनात रूजलं पाहिजे तरच आपण म्हणू शकतो. माझ्या भारत देशाचा मला अभिमान वाटतो. रखरखत्या उन्हात शेतकरी कशाचीही पर्वा न करता राबराब राबतो अनेक दुःखांचा तो सामना करत असतो त्याच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी गोष्टी होत असतात तरीही तो जगण्याचे इमान विसरत नसतो तो मातीशी नाळ जुळवतो बेमानाशी नाही.आणि बेमान जे होतात ते विषारी सापा पेक्षाही विखारी असतात. त्यांच्यात इमानदारी हि रक्तात नसते. तो जास्त वेळ टिकत नाही आपलं निस्वार्थ भावनेतलं कार्य एक विश्वरूपा सारखे वाढत जातं विवेकबुद्धीचं स्वरूप आपल्या भारत देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी बघितलेलं भारतासाठीच स्वप्न प्रत्यक्षात कसे साकार होईल याचा मूळ पाया कसा मजबूत करता येईल हे मी विचारशीलतेनं पुन:रतत्त्वास सिद्ध करेन की साकार करण्यासाठी आकार घ्यावा लागेल आकार मी एकटा नाही घेणार करोडो जनतेला सामील व्हावं लागेल, तरच कर्मयोगाचं हत्यार उचलता येईल. तरच "नभात उंच भरारी घेण्यासाठी गरुडा सारखं आरुड व्हावं लागेल" धावत्या युगात चालताना खड्डे खूप झाले आहेत आधी ते बुंजा वे लागतील मग चालण्यास अडथळा होणार नाही आणि कुठलीही दुर्घटना घटणार नाही ही जबाबदारी भारताच्या प्रत्येक नागरिकाची आहे तेव्हा म्हणूया माझ्या देशाचा मला अभिमान वाटतो... कर्म के स्वधर्म सें,विश्र्वरूप ध्यान में...


Rate this content
Log in