Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

akshata alias shubhada Tirodkar

Others

4.0  

akshata alias shubhada Tirodkar

Others

संस्कार

संस्कार

2 mins
534


सीमाला तिच्या मैत्रिणीच्या नातीच्या बारशासाठी आमंत्रण आले काय भेटवस्तू घेऊन जायची हा प्रश्न तिच्यासमोर होता जिवलग मैत्रीण मग असंच कसं जाणार हा विचार ती करत होती सोन्याची की चांदीची वस्तू कपडे की आणि काही... 

"काय कुठल्या एवढ्या विचारात मग्न आहात?"

"काही नाही हो बारश्याला काय घेऊन जायचं हा विचार करते"

"त्यात काय विचार करायचा घेऊन जा काहीतरी"

"काहीतरी काय नेणार दिसायला चांगले असायला हवे ना मला सुचत नाही सांगा ना सोन्याची वस्तू घालू की कपडे देऊ" 

"खरं सांगू पुस्तक दे"

"पुस्तक तुम्ही पण ना"

"बारश्याला कोणी पुस्तक नेत का कस दिसेल ते "

"मला सांग बारसा हा नवजात बाळाला नाव देण्यासाठी असतो ना आणि त्या बाळाला कुठे माहित असते काय चालय दे आणि गिफ्ट बदल तर त्या भाबड्या जीवाला कुठे माहित असते"

"त्याना नसेल पण घरातील इतर मंडळी तर पाहतील ना काय म्हणतील जिवलग मैत्रिणीने काय दिले" 

"बारसा हा कश्यासाठी असतो त्या जीवाला नाव देण्यासाठी ना मग कशाला उगीच तो दिखावा कोणी काय आणण्याचा त्या बाळाला काय चालंय हे माहित सुद्धा नसते आणि भेट वस्तू तर दूरची गोष्ट सोन्याची वस्तू त्याच्या मापाची आज दिली तर उद्या होणार आहे का आणि खेळणी काय मोठेपणी खेळणार"

"म्हणजे बाळाला खेळणं देऊ नये"?

"मी कुठे म्हणालो देऊ नका"

"तुम्ही ना आता एक आणि आता एक बोलता म्हणे पुस्तक ने लहान बाळाला काय वाचता येत"

"मी कुठे वेगळं बोललो"

"खेळणं द्या जरूर द्या पण त्याच्या वयाप्रमाणे हेच तर त्याच खेळण्याचं बागडण्याचं वय असत"

"म्हणजे मी समजले नाही"

"अगं बाळा साठी एक मस्त पॆकी खेळणं घेऊन जा पण आई साठी मात्र पुस्तक"

"पुस्तक कसलं पुस्तक" 

"साने गुरुजी लिखित श्यामची आई"

"श्यामची आई"

"हो"

"बारश्या च्या दिवशी खूप भेट वस्तू येतील पण संस्कार हि खरी भेटवस्तू त्या बाळाला मिळाली पाहिजे आई हि बाळाला आकार देते बाळ हे माती सारखं असत जसा आकार दिला कि तसे बनेल जर चांगला आकार दिला तर चांगले व्यक्तिमत्व बनेल नाही तर मग आईलाच दोषी ठरवलं जात हयाच उत्तम उदारहण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक हे पुस्तक थेट आईच्या मनापर्यंत पोहोचवते त्या पुस्तकाबद्दल बोलले तेवढे शब्द कमी पडतील असं अजरामर साहित्य आहे ते म्हूणन सांगतो हे पुस्तक ने आता त्या बाळाला खरी गरज चांगल्या संस्कारांची आहे लोक काय म्हणतील पेक्षा आपण चांगले काहीतरी करतो हे महत्वाचे"

"वाह तुम्ही कधी एवढे चांगले प्रवक्ते झालात पण मला तुमचे म्हणे पटले मी उद्या पुस्तक खरेदी करीन"

"तू कशाला जाते मी जिथून पुस्तक खरीदी करतो ते बुक स्टॉल वाले ऑर्डर दिल्यावर होम डिलिव्हरी करतात"

"हो का बरं झालं चिंता मिटली"

"चला तुमच्यासाठी चहा करू का"

"हो कर ना मला चालेल काय माझ्या भाषणावर खुश झाली वाटतं"


Rate this content
Log in