Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Children

3  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Children

सोनपरी अवतरली

सोनपरी अवतरली

2 mins
330


सोनपरीने ठरवलं की मारावा पृथ्वीवर एक फेरफटका आणि पहावं काय चाललय आजच्या बच्चे कंपनीच्या आयुष्यात. सोनपरी अवतरली तिनी एका घरात प्रवेश केला. घरात सामसूम दिसत होते. हॉलमध्ये तिने प्रवेश केला तिथे कोणीच नव्हते. तिनी आत डोकावले एक बाई किचनमध्ये जेवण बनवण्यात व्यस्त होती. शेजारच्या खोलीत सोनपरीने प्रवेश केला. एक लहान मुलगा पलंगावर झोपून मोबाईलमध्ये गढून गेला होता. 

"एवढासा हा आणि मोबाईलमध्ये काय हे बालपण"

"सोनपरीला राहवलं नाही त्याच्याशी ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली" 

"हॅलो" 

"कोण आणि तू इथे" 

"शू मी ना लहान मुलांची फ्रेंड आहे तुला भेटायला आली आहे पण तू कोणाला सांगू नको हा"

"का आईबाबांनी मला लोकांशी बोलायचं नाही म्हटलं" 

"मी लोक नाही आहे "

"मग तू ताईला ओळखतेस" 

"ताई"

"नाही पण मी परी आहे जी फक्त मुलांना दिसते" 

"परी"

"हो माझं नाव सोनपरी आहे आणि तुझं"

"माझं नाव कौस्तुभ" 

"वाह छान नाव आहे"

"कितवीत आहेस तू" 

"पाचवीत"

"बरं काय करतोस मोबाईलमध्ये" 

"गेम खेळतो"

"आणि हा मोबाईल कोणाचा"

"माझा"

"तुझा"

"बरं तू आईबरोबर किचनमध्ये का नाही गेलास"

"ती माझी आई नाही ताई आहे. जेवण बनवायला येते आमच्याकडे."

"मग आईबाबा"

"कामावर"

"मी बोअर होतो ना एकटा म्हणून मोबाईल दिला मला. मी गेम खेळतो १००० लेवल पार केले मी."

"तुला टीव्ही बघायला नाही आवडत"

"नाही"

"मी माझे आवडते प्रोग्रॅम मोबाईलवर पाहतो"

"तुझे मित्र आहेत ना"

"आहेत पण घरी नाही बोलवत त्याना आईबाबांना नाही आवडत"

"चल मी जातो मला भूक लागली आहे"

"बरं"

"पण तू उद्या येणार ना सोनपरी"

"मी हो शूअर"

"काय हे बालपण... एक काळ असा होता मला पाहण्यासाठी बच्चे कंपनी जमून टीव्हीसमोर सज्ज असायची आणि आता एकटी दिवस काढतात. आजकालचं बालपण मोबाइल हातात देऊन बंदिस्त झालंय. ज्या बालपणात बागडणं असायचं तिथे आता एकटं राहणं आलं. जर माझ्या ह्या जादूच्या काठीत अशी जादू असती तर हे बालपण मी बदललं असतं."

सारं पाहून सोनपरीचं मन भरून आलं...


Rate this content
Log in