Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunita madhukar patil

Children Stories Others

4.9  

Sunita madhukar patil

Children Stories Others

ओळख चांगल्या वाईटाची.

ओळख चांगल्या वाईटाची.

4 mins
1.1K


    आजी आणि नातींचा खेळ चांगलाच रंगात आला होता... कारण बराच वेळ चाललेला माझ्या चिमण्यांचा चिवचिवाट थोडा मंदावला होता... उत्सुकतेपोटी आईंच्या खोलीत डोकावलं , बघते तर काय माझ्या दोन्ही चिमण्या आरोही आणि आयुषी मस्त आजीच्या कुशीत पहुडल्या होत्या.. .मस्त आजी नातींच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आरोही आठ वर्षाची तर आयुषी पाच वर्षाची होती...♥

     

आयुषी : आजी !!! सांग ना ग गोष्ट...


अच्छा !!! तर ही बच्चा पार्टी आज आजीकडे गोष्टीची फर्माईश करत होती...आजीने पण थोडेसे आढेवेढे घेतले...एका फर्माईशीमध्ये गोष्ट सांगेल ती आजी कसली...त्या शिवाय गोष्टीची रंगत तरी कशी वाढेल ?... मीही थोडावेळ तिथेच रेंगाळले आणि बाजुच्याच खुर्चीवर विसावले...आजी आणि नातींच्या गोड गुजात हरवून गेले...


आजी : हो रे बाळांनो सांगते...तर मग ऐका हं...


एक होती परीरानी आईबाबाची लाडुली । 

अभ्यासात हुशार होती दादाची सानुली ।।

टपोरे डोळे तिचे गोरे गोरे गाल ।

 होती आजीआजोबांची छकुली ।।


अशी ही परीरानी खुप हुशार होती बर का ! नेहमी उत्साहित, आत्मविश्वासाने भरलेली . आईबाबांच्या तर काळजाचा तुकडा होती...शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायची...आणि सर्व शिक्षकांची लाडकी होती... ती रोज बस ने स्कुलला जायची...


एक दिवस शाळेत जाताना तिला जाणवलं की एक राक्षस तिचा पाठलाग करतोय...तो रोज तिचा पाठलाग करायचा आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा...मग ती पण त्याच्यावर लक्ष ठेवू लागली...त्याला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू लागली...त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागली...


आयुषी : मग काय झालं आजी...त्या राक्षसाने परीला खाऊन टाकलं...?


आजी : नाही ! अजिबात नाही...आपली परी खुप हुशार होती...तिच्या आईने तिला स्वरक्षणाचे धडे दिले होते...चांगला स्पर्श वाईट स्पर्श ह्यातील अंतर समजवले होते... अशा राक्षसांशी कसे चार हात करायचे हे शिकवले होते...आणि बर का आयुषी बाळा हे राक्षस कुणाच्याही रुपात आपल्यासमोर येऊ शकतात...कुठे ही आढळतात शाळेत , बागेत , क्लास , मंदिरात अगदी आपल्या घरातसुद्धा...ते आपल्यासारखेच दिसतात त्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण असतं...


     मग परीने राक्षसाबद्दल आपल्या आईबाबांना सांगितले... आईबाबांनी पोलिसात तक्रार केली... आणि पोलिसांनी त्याला पकडून जेल मध्ये टाकलं...


आरोही : पण आजी तु म्हणालीस ना की हे राक्षस कुठेही आढळतात आणि आपल्यासारखेच दिसतात मग त्यांना ओळखायचं कसं...आणि चांगला स्पर्श वाईट स्पर्श म्हणजे काय… ? 


    चौकस आणि चिकित्सक बुद्धीच्या आरोही ने आजीला प्रश्न केला...


आजी : हो ! ते कुठेही आढळतात...आणि कोणीही असू शकतात , आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्येच ते दडलेले असतात... फक्त आपल्याला त्यांना ओळखता आले पाहिजे...आता प्रश्न उरला त्यांना ओळखायचं कसं...


आयुषी : हं ! आजी कसं ओळखायचं…?


आजी : सांगते बाळा...बाळा ! आयुषी मला एक गोष्ट सांगशील... आई , बाबा मी जेंव्हा तुझे लाड करतो तेंव्हा तुला कस वाटतं...?


आयुषी : खूप मज्जा येते...खूप छान वाटत...


आजी : हो ना ! यालाच चांगला स्पर्श म्हणायचं... पण कधी कधी कोणीतरी आपले खूप लाड करतात , आपली पापी घेतात , आपली मर्जी नसताना उगीचंच जबरदस्ती लाड करण्याचे प्रयत्न करतात...आपल्याला ते आवडत नाही...तो झाला वाईट स्पर्श... तेंव्हा आपण थोडं सावध व्हायचं...आशा लोकांपासून थोडं लांब रहायचं...चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजून घ्यायचा...


आयुषी : आजी स्पर्श म्हणजे काय?


आरोही : अंग ! एवढं पण तुला माहिती नाही...स्पर्श म्हणजे "touch" ...चांगला स्पर्श म्हणजे good touch आणि वाईट स्पर्श म्हणजे bad touch...


 आजी : आणखी एक महत्वाची गोष्ट कोणालाही आपल्या खाजगी शारीरिक अवयवांना हात लावू द्यायचा नाही , आणि कोणी तसा प्रयत्न केला तर नाही किंवा स्टॉप बोलायचं...आणि तरीही नाही ऐकलं तर जोरजोरात गोंधळ करायचा...मोठमोठयानी ओरडून आपल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करायचं आणि त्याला चांगलं बदडून काढायचं...आणि नेहमी आपल्या आईबाबांच्या संपर्कात रहायचं...त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलायच्या त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही...


आरोही : आजी ! खाजगी शारीरिक अवयव म्हणजे काय गं...?


Private body part...मी लगेच ऊत्तरले आणि त्यांना समजावले की आपण swimmimg costume घातल्यानंतर जो भाग swimming costume नी झाकला जातो तो शरीराचा भाग म्हणजे private body part...आणि त्याला आपल्या परवानगीशिवाय कोणालाही हात लावण्याचा अधिकार नाही...स्वतःच संरक्षण स्वतः करायचं त्यासाठी karate , taekwondo सारखे self defence चे स्वरक्षणाचे धडे शिकायचे...समजलं का ?


आरोही : हो समजलं , आपल्या आजुबाजूच्या राक्षसांपासून सावध रहायचं...


आयुषी : हो मी पण सावध राहणार ...आणि राक्षसांशी परीरानीसारखं ढिशुम-ढिशुम करणार...


आजकाल समाजात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे बऱ्याच दिवसापासून माझ्याही डोक्यात या विषयावर मुलींशी बोलण्याचा विचार येत होता...पण कसं बोलणार? काय बोलणार? त्या अजून लहान आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतील का असे बरेच प्रश्न माझ्यासमोर होते...पण सासूबाईंनी ह्या सर्व गोष्टी किती हसतखेळत गप्पागोष्टी करत त्यांना समजवल्या...मलाही त्यांच्या विचारांची प्रगल्भता आज समजली...आणि म्हणूनच घरात आजीआजोबाचं स्थान किती महत्वाचं आहे हेही मला समजलं...


माझ्या चिमण्या तर आजीकडून नवीन गोष्टी तर शिकल्याच पण मीही घरातलं मोठ्याचं स्थान किती महत्वाचं आहे हे शिकले...



Rate this content
Log in