कविता
कविता
कोरोनाच्या शत्रुसंगेे
युद्ध आमुचेे सुरु
जिंकूू आम्ही जिंकू....
नक्कीच आम्ही जिंकू।। ध्रु।।
पाळूू आम्ही संचारबंदी
नाही जाणार गर्दीमधी
हात पुन्हा-पुन्हा आम्ही धुऊ
जिंकूू आम्ही जिंकूू...
नक्कीच आम्ही जिंकू।। १।।
सरकारी आदेशांचे पालन करू
डॉक्टर आणि पोलिसांना
धन्यवाद देऊ
जीवन असेही मस्त जगू
जिंकूू आम्ही जिंकू......
नक्कीच आम्ही जिंकू।।२।।
संकटे आम्हावर आली किती
त्यांची आम्हा नाही भीती
यातून सुद्धा आम्ही अजिंक्य ठरू
जिंकू आम्ही जिंकू ......
नक्कीच आम्ही जिंकू।।३।।
रोगग्रस्त बांधवांसाठी प्रार्थना सुरू
गरजूंना मदत करू
आम्ही अजेय होऊ
जिंकू आम्ही जिंकू.......
नक्कीच आम्ही जिंकू।।४।।
माणूस म्हणून जगणे शिकू
स्वच्छतेच्या सवयी जपू
जगण्याचा धडा गिरवू
जिंकू आम्ही जिंकू .......
नक्कीच आम्ही जिंकू।।५।।