चारोळी
चारोळी
1 min
12K
मोठी ज्वाला होता आलं नाही
म्हणून......
पणती होण्याचं
कधीच नाकारायचं नसतं.
............
मला माझ्याकडील सुख
सर्वांना वाटायचंय
आणि प्रत्येकाच्या दुःखात
वाठाही ठेवायचायं.
............
माझं प्रत्येक वेळीच सजन
फक्त तुझ्यासाठी नसतं
कधीतरी मलाही
माझ्यासाठी.....नटावस वाटतं.
............
दोन घडीचे आपले नाते
वाटते ते जुनेच आहे
तुझ्या अबोलपणाचे नखरे
अजुनही त्यात कांही उणेच आहे.