मोबाईल छंद
मोबाईल छंद


मोबाईलअन् व्हिडिओ गेम चा
छंंद तुजला जडला
मीडियावर तुझा रोज फ्रेंड
असे नवा- नवा।।१।।
दुरच्या त्या फ्रेंडमुळे
तू आज दुरावला
माझ्या लाडक्या तान्ह्या
तू कुठे हरवला।।२।।
तू आमच्या जीवनातील
स्वप्न -सुंदर
आम्हा जन्मदात्यांची
थोडी तरी कर कदर।।३।।
तुझ्या दुराव्याने
कंठ दाटुन येतो
अश्रूंच्या डोहात दूर
डुंंबुनिया जातो।।४।।
आम्ही तुझ्या आयुष्यातील
जणू पालापाचोळा
पण, तुझ्यासाठी जीव होतो
आतून गोळा।।५।।
जवळ असूनही तुला
भेटण्याचं नाही सुख
हेच आमच्या जीवनातील
भले -मोठे दुःख।।६।।
असह्य करतो हा ....
जवळचा....... दुरावा
तुझ्या भेटण्याचा आनंद
आम्हाला हवा ।।७।।
वस्तूच्या गर्दीत
हरवू नको रे......
मृगजळाच्या मागे उगीच
धावू नको रे.........।।८।।
एक दिवस.......
कळेल तुला....
आई -बापाची माया
तुझ्याचसाठी झिजवली ही काया।।९।।