महिला दिन
महिला दिन
आता गायले जातील गोडवे तुझ्या स्त्री शक्तीचे
कारण दिवस आलेत जवळ महिला दिनाचे.
पण खरच आहेस का तू सुरक्षित या जगात
द्रौपदी चा कृष्णसखा नाही एकही उरला या जगात
रावण आणण दुर्योधनाची पिल्लावळ सारी जन्मली
का ग माऊली तू त्या पेक्षा वांझ नाही राहिली
नकोच करू तू अपेक्षा या वासनेने भरलेल्या जगाकडून
हो समर्थ स्वतः अन जग या जगाशी दोन हात करून
कारण आजचा दिवस संपला. की पुन्हा
पाहिलं जाणार आहे फक्त तुझ शरीर
तू म्हणजे शरीर एवढीच आहे ओळख जगात तुझी
तू रंभा तू उर्वशी तूच झालीस किरण बेदी
पण तू राहीलीस कायम एक स्त्री, एक मादी
आता हे स्त्रीपण झुगारून दे सखे
या जगाला आता तुझी भीती वाटू दे सखे.
नको बसू रडत कुढत, नको होऊ गुलाम
तुझ्या हातात ही जोर आहे आता देऊ नको त्याला लगाम
लढ सखी लढत राहा तुझ्या माझ्या लेकींसाठी
जगायचा असेल या जगात तर हातात घ्यावीच लागेल तुला काठी