स्वातंत्र्याचा महोत्सव
स्वातंत्र्याचा महोत्सव
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया .
देशभक्त वीरांना आधी प्रणाम करूया.
अनेकांनी देशासाठी घरादाराचा त्याग केला.
तुरुंगातच आपला अखेरचा श्वास सोडला .
त्या वीरांना आधी प्रणाम करूया .
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया .
टिळकांचा जहालवाद, नेताजींची आजाद सेना.
गांधीजींचा सत्याग्रह , वल्लभभाईंचा पोलीदीपणा .
या देशभक्तीला आधी प्रणाम करूया .
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया .
भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेवांनी डाव क्रांतीचा केला .
हसत , हसत प्रत्येक जण देशासाठी फासावर गेला.
. त्यांच्या या क्रांतीला आधी प्रणाम करूया .
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया .
सावरकरांनी देशासाठी अखंड तुरुंगवास भोगला .
ज्यतिबा सावित्रीनेजीवन वाहीले समाजकार्याला .
त्यांच्या या कार्याला आधी प्रणाम करूया .
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया ..
झाशीच्या राणीने स्वांतत्र्यासाठी संघर्ष केला .
चाफेकर ,आझादांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला .
त्यांच्या या शौर्याला आधी प्रणाम करूया .
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया नेहरू ,शास्त्री , बटुकेश्वर यांनी तुरुंगवास भोगला .
विवेकानंदांनी भारताची महानता दाखवली जगाला.
या देशभक्तीला आधी प्रणाम करूया.
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया कर्वे आंबेडकर समाज सुधारणेसाठी झटले सदा.
अगणित वीरांनी देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला .
त्यांच्या कष्टांना आधी प्रणाम करूया.
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करूया . सीमेवर देश रक्षणासाठी सैनिक ही अखेरपर्यंत लढला .
अभिमानाने ,आदराने आपला ध्वज तिरंगा फडकवा .
शुर वीरांचे बलिदान स्मरून ध्वजाचा आदराने मान ठेवा.
भारतभू च्या सुपुत्रांना आधी प्रणाम करूया
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया .
