STORYMIRROR

Jyoti Bhanage

Others

4  

Jyoti Bhanage

Others

वडील

वडील

2 mins
3

            वडील म्हणजे एक मोठा आधार असतो 
             सावली देणाऱ्या वटवृक्षासारखा भासतो .             रागवला तरी प्रेमाने जवळ घेणारा तो बाप असतो . 
मुलांच्या झालेल्या कौतुकाने तो  मनातून सुखावतो .
मुलांच्या हट्टासाठी तो काहीही करायला तयार असतो .
                  वडील म्हणजे एक मोठा आधार असतो .
यशस्वी मुलाच्या नावाने ओळख अभिमानाने मिरवतो .
मुलाच्या अपयशाच्या वेळी नेहमी ठामपणे उभा असतो .
निराशेतुन काढण्यासाठी त्याचा हात नेहमी पुढे असतो .
                    वडील म्हणजे एक मोठा आधार असतो .
लहानपणी आपल्या लेकीचे प्रेमाने कोडकौतुक करतो .
लेकीच्या लग्नामधे तो आपले अश्रू लपवत असतो .
पण लेक सुखात राहावी म्हणुन सतत झटत असतो .
                    वडील म्हणजे एक मोठा आधार असतो .
सासरी जाणाऱ्या लेकीचा वडील एक अभिमान असतो .
 प्रेमाने तीची चौकशी करणारा काळजीवाहक असतो.
तीच्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणुन प्रयत्नशील असतो                       वडील म्हणजे एक मोठा आधार असतो .
मुल वाईट निघाले तर त्याच्यासारखा दुखी कुणी नसतो .
म्हातारपणी त्याला केवळ मुलांचा आसरा हवा असतो .
प्रेमाचे दोन बोल , व मुलांचा सहवास हवा असतो .
                      वडील म्हणजे एक मोठा आधार असतो .
                       सावली देणाऱ्या वटवृक्षासारखा भासतो


Rate this content
Log in