STORYMIRROR

Jyoti Bhanage

Others

4  

Jyoti Bhanage

Others

फुलांची दुनिया

फुलांची दुनिया

2 mins
3


        फुले म्हणजे निसर्गाचा चमत्कारच मला वाटती .
         त्या फुलांचे आकार विविध प्रकारचे कितीरी . प्रत्येक फूलांचा वेगवेगळा सुंदर सुंगध ही.
निळा ,लाल ,पिवळा ,जांभळा रंग कीती .    
           गुलाबाला फुलांचा राजा सगळे म्हणती .    .                  लांबूनही दिसतो हा बसलेला सिंहासनी .
 पारिजातक स्वर्गात फुलले सत्यभामेच्या अंगणी   
 पांढरे,केसरी कपडे घालून आलेली जणू छोटी परी . 
             मोगऱ्याच्या सुगंधाने आसंमत भरून जाई.
              जाई ,जुई चा  गजरा शोभे स्त्रियांच्या डोई .
झेंडू वाटे रुबाबदार , डोक्यावर फेटा भारी .
सणाला याचा मान, याचेच तोरण शोभे दारी.
          चाफयाचे तर कीती तर प्रकार दृष्टीस पडती .
          सोनचाफ्याच्या सुंगधाने मन मात्र भारावून जाई .
लाल जास्वंदाचे फुल गणेशाची आठवण करून देती.
कुंदाची फुले पाहून वाटे चांदण्या भुतलावर अवतरी.
          निशा सुंगधित होते हिच्यामुळे ती ही रातराणी .
          तर दिनास सुंगधित करीत असते ही गुलछडी .
अशी कितीतरी फुले फुललेली दिसतात रानोरानी .
सृष्टीने अंथरली जणू फुलांची सुंदरशी ही  दुलई .
         फुलांप्रमाणे जगावे दुसऱ्यांना करावे आनंदी.
         आपल्या अस्तित्वाने दुसऱ्यांचे जीवन करावे


Rate this content
Log in