STORYMIRROR

Jyoti Bhanage

Others

3  

Jyoti Bhanage

Others

दिपज्योती

दिपज्योती

1 min
370

आला ,आला सण हा मोठा दिवाळीचा .

दिप ज्योतीने सर्वत्र प्रकाश करण्याचा .          

आला ,आला सण हा मोठा दिवाळीचा.                  


सर्वांना आनंद नवनवीन कपडयांचा               

घर स्वच्छ करून , सुंदर करण्याचा .              

आला , आला सण हा मोठा दिवाळीचा


दिवाळी सण चवदार, खमंग फराळाचा .

खमंग चिवडा , चकली व गोड लाडवाचा.

आला , आला सण हा मोठा दिवाळीचा.


सडा , सुंदर रांगोळीने अंगण सारे सजवूया.

फुलांच्या माळांनी घराची सजावट करुया .

संध्येला दिप ज्योतीने अंगण प्रकाशित करूया .

आकाश कंदिल लावून घर उजळुन टाकुया           

आला, आला सण हा मोठा दिवाळीचा


      अंभ्यगस्नान करू उटणे लावून पहाटेला . 

      फटाक्यांची मजा वाटते लहान मुलांना        

       आला , आला सण हा मोठा दिवाळीचा .


 एवढे मात्र करा झोपडी ही दिव्याने उजळू या.

 प्रत्येकाच्या मुखी लाडूचा गोडवा पोहचवुया .     

     आला , आला सण हा मोठा दिवाळीचा.


Rate this content
Log in