STORYMIRROR

Jyoti Bhanage

Others

4  

Jyoti Bhanage

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
225

वर्षा ऋतुत पडती पाऊसधारा.

       नदया, झरे, लागले वाहू .

 वाटते सृष्टीला ही आनंद झाला .

       झाडे , फुले लागले डोलू .

      चला मृदगंध पावसाचा घेऊ.


रंगीत फुलांनी माळरान सजला .

      धरणीने नेसला हिरवा शालू.

हिरवा डोंगर देखना दिसू लागला.

       पक्षीही आनंदाने लागले गाऊ.

       चला मृदगंध पावसाचा घेऊ.


डोंगरानेही धुक्याची पांघरली चादर .

       मधेच अरुण लागला डोकावू .

ऊन पावसाचा खेळ सुरू झाला .

       आकाशात दिसू लागले इंद्रधनू.

        चला मृदगंध पावसाचा घेऊ.


बळीराजा शिवार पाहून सुखावला.

       शेते ही लागली वाऱ्यावर डुलू.

 हिरवे रान पाहून गुरांना आनंद झाला .

        रंगीत फुलपाखरे लागले दिसू .

        चला मृदगंध पावसाचा घेऊ.


वाटते, मुक्तपणे निसर्गाचा आस्वाद घ्यावा .

       पावसात भिजून निसर्गाची मजा लुटू

डोंगराच्या धुक्यात शिरून संचार करावा.

       निसर्गाची उधळण मनापासून उपभोगू .

              चला मृदगंध पावसाचा घेऊ.


निसर्ग चित्रकार होऊन चित्र काढू लागला .

       त्याची सुंदर चित्रकारी डोळे भरून पाहू .

सृष्टीने निसर्गाच्या कणाकणात जीव ओतला .

      ताण विसरून तो उत्साह मनात भरून घेऊ.

                 चला मृदगंध पावसाचा घेऊ.


Rate this content
Log in