मैत्री
मैत्री
नात्यातील नसली तरी जी वाटते आपली ,
हृदयातुन वाटणारी तीच खरी ही मैत्री.
भांडणारी, रागावणारी आणि रुसणारी ,
प्रसंगी खळखळुन हसवणारी ही मैत्री .
शाळेत असतांना पेन्सीलवरून भांडणारी,
पण आपले चॉकलेट तोडुन देणारी ही मैत्री.
वाद घालणारी, कडाडून भांडणारी , मारणारी , ...
पण दुःखात गळयात पडुन रडणारी ही मैत्री.
डब्यातील आवडीचा पदार्थ हक्काने खाणारी,
कृष्ण सुदाम्याच्या प्रेमासारखी असावी ही मैत्री .
शिवबाचे संवगडी व संभाजीच्या कलशासारखी,
संकटसमयी शेवटपर्यंत साथ देणारी ही मैत्री.
कॉलेजच्या चांगल्या वाईट गोष्टीत साथ देणारी,
अपयश आले तर प्रेमाने समजावणारी ही मैत्री
कधी दुःखाच्या प्रसंगी सावली प्रमाणे राहणार
तर आनंदाच्या प्रसंगी आनंदुन जाणारी हीमैत्री
आई वडीलांच्या रोषापासून सांभाळून घेणारी ,
त्यांच्याही तेवढीच उपयोगी पडणारी ही मैत्री.
संकटात धीर देऊन मनोबल वाढवणारी शक्ती,
जरुरी पडेल तेंव्हा मदतीचा हात देणारी ही मैत्री.
वाईट विचार येता मनी, संकट येता चोहोबाजुनी,
एकदा बोलुन तर बघा वाट ही दाखवेल ही मैत्री .
