भारत माझा देश महान
भारत माझा देश महान
1 min
163
भारत माझा देश महान
चला करूया वंदन त्यास
विविध परंपरेने नटलेला
भारत माझा देश महान
केशरी पांढरा हिरवा तिरंगा
आहे भारताची शान
उत्सव तीन रंगांचा
आहे भारताचा मान
भारत माझा देश महान
भारत माझा देश महान||1||
विविध धर्म पंथ येथे
न जाती न भेदभाव
सर्व धर्म मिळूनी राहती
हाच भारताचा थाट
भारत माझा देश महान
भारत माझा देश महान||2||
स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
केला येथे त्याग
त्या वीरांना करुनी स्मरण
बनवू भारत छान
भारत माझा देश महान
भारत माझा देश महान||3||
