STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

वंदन

वंदन

1 min
250

वंदन माझ्या देशाला

माझ्या मातृभाषेला

वंदन मातापित्यांना

वंदन त्या गुरूजनांना


वंदन काळ्या मातीला

धान्य पिकवणार्‍या शेतीला

शेतामध्ये राबणार्‍या

कष्टकरी बळीराजाला


वंदन त्या महापुरूषांना

त्या स्वातंत्र्यसैनिकांना

देशासाठी लढणार्‍या त्या

असंख्य शूर जवानांना


स्त्रियांचा सन्मान राखला

वंदन त्या शिवरायांना

दिले महान संविधान या देशा

वंदन त्या भिमरायांना


हात जोडूनी वंदन करतो

सार्‍या संत महात्म्यांना

बंधुभाव अन् समतेला

जपणार्‍या थोर विचारांना...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन