STORYMIRROR

Anusaya Kathi

Others

3  

Anusaya Kathi

Others

अगणित पाऊस

अगणित पाऊस

1 min
242

पावसा तू आलास अन् लगेच गेलास 

एखाद्या अगणित पाहुण्यासारखा....

तू येणार म्हणून लोक खूप आनंदात होते 

पण तू आलास अन् लगेच गेलास....


शेतकरी बसले तुझी वाट पाहत

वाटले त्यांना तू आता येणार 

आभाळ दाटले की, सर्वांचे डोळे तुझ्याकडे 

तुझी आस लागली होती, पण तू आलास अन् लगेच गेलास....


तू आलास की तुझ्यात चिंब भिजावं वाटतं

तुझ्याकडे सारखं पाहावं वाटतं....

पण तू येतच नाहीस, आलास की लगेच जातोस....


तू येतो असं सगळ्यांना वाटतं

पण तू येतच नाहीस....

पण, पुन: नक्की ये 

खूप आनंद आणि नवी अभिलाषा घेऊन 


Rate this content
Log in