Ashvini Duragkar

Others

4.1  

Ashvini Duragkar

Others

विठ्ठल माझ्या अंतरी..

विठ्ठल माझ्या अंतरी..

6 mins
401


“भुवरी अवतरी रंगरूप हे विट्ठल विट्ठल माऊली”... सीरियल लागताच कांचनने टी॰वी॰चा आवाज़ फ़ुल केला... आणि गुणगुणु लागली..

   “काय ग.. काय आहे हे.. मला एक तर हे देवाचे सीरियलस वगैरे अजिबात आवडत नाही त्यात तुझ काय हे नेहमीच असत... हे गाण लागल की आवाज़ फुल.. कुणाला त्रास बीस होतो कळत नाही काय तुला”..


“अग वेड लागलय काय तुला.... पांडुरंगाच गाण आहे... माझा आवडता देव अन सिरयल ही”...


“गेल्या वर्षभरा पासन हेच ऐकते आहे मी.. आता या पुढे लागल की फेकुन देईल मी हे रिमोट आणि आपला देव आपल्याच जवळ ठेव की...माझी आई मी ३ वर्षाची असतांनी गेली.. बाप ही दुसरी सोबत लग्न करुन मोकळा झाला.. खुप हाल भोगले मी.. तेव्हा कुठे होते हे ३७ कोटी देवी देवता आणि तुजला पांडुरंग... मला नाही विश्वास कोण्या देवावर”...


“ये मृदु तु नाराज नको होवुस ग.. कमी करते मी आवाज़”...

     कांचन आणि मृदु २ वर्षापासन एकाच खोलीत राहात होत्या... दोघीही शिक्षणसेविका म्हणुन वर्धा जिल्हयात कार्यरत होत्या.... मृदुलाला आलेल्या अनुभवावरन देवावर अजिबात विश्वास नव्हता... तिच्या उलट.. कांचन होती.. देवावर भरभरुन विश्वास... पांडुरंग तर असा की जसा तिचा सखा... चतुर्मास केल्याशिवाय तिचा होये ना.. बरेचदा आपल्या पाठीशी तो उभा आहे याची प्रचिति देखील तिला आली होती... पण मृदुला हे कळे ना..

   आषाढी एकादशीचा दिवस होता... आज पासन चतुर्मासाला सुरवात होणार होती.. कांचन पहाटेलाच उठली... स्नान करुन मस्तपैकी पुजा केली.. मृदुलाच्या धाकाने... ती उठायच्या अदोगरच तिने सगळ आटोपल... फराळ वगैरे करुन तयार होता... नामस्मरण करीत ती बसली होती.. तेवढ्यात मृदुला उठली... घरात एक वेगळाच सुगंध दरवळलेला होता... ती पण तयार झाली... 

   नाश्ता करावा म्हणुन तिने अंडी हातात गेली.. कांचन जोरात ओरडली आणि दचकुन मृदुच्या हातुन अंड खाली पडल आणि फुटल... 

“अबे ये.. शेवटच होत....तेही फुटल आवाजाने तुझ्या. आता काय...? काय खायच..? मला जायच आहे visit ला”...

“ऐ शाहाने... आज आषाढी एकादशी आहे. उपवास आहे माझा... तुला साबुदाना उसळ खुप आवडते ना... घे खावुन आणि तु पण करुन बघ ना या वेळेला उपवास”....


“What Rubbish... आपल्या जवळ ठेव ते फुकटचे उपवास तापास”...


“ऐ मुर्ख आज तरी अशी नको बोलुस ग”..


“हे बघ मला या विषयावर चर्चा अजिबात नकोच”... एवढ बोलुन मृदु रागारागात काही न खाता निघुन गेली..

 कांचन ला खुप वाईट वाटले.. पण तिच्या तिचा नाईलाज होता..

   मृदु बोर्ड न बघता तरतर भलत्याच बसमध्ये बसुन गेली... बस जात होती काैंडण्यपुरला... रखुमाईचे माहेर घर... एकादशीचा दिवस असल्यामुळे बसमध्ये पाय ठेवायला ही जागा नव्हती... मृदुला खुप रागात होती.. तिच्या डोक्यात जुन्या आठवणींचा मारा होत होता... 

डोळयात अश्रु गजबजले होते... बसभर दर्शनाला जाणारी मंडळी विट्ठल नामाचा जप करीत होती.... मृदुलाला अजुन अज़ुन चिड होत होती.. कानात earcord घालुन ती झोपी गेली... बसमध्ये फिरकायलाही जागा नसल्यामुळे कंडॅक्टरही तिकीटासाठी आले नाही... ती तशीच झोपुन राहाली..

    झोप उधडली तेव्हा ती बस तिच्या शेवटच्या स्थानकावर येवुन थांबली होती... सगळी मंडळी विट्ठल नामाचा गजर करित उतरली... आता मात्र मृदुलाला शंका येवु लागली... आपण अलत्या भलत्या ठीकाणी तर नाही आलोत ना...? ती ताडकन उठली... वाकुन बोर्ड बघीतला.. आणि लांब श्वास घेत परत खाली बसली... 

    “अरे यार... कोणत्या भलत्या ठिकाणी पोहचली.. कांचन सगळ तुझ्यामुळे झालय... मला परत येवु दे मग सांगते तुला”.... ती मनातल्या मनातच पुटपुटली... 

  पोटात उंदरांचा थैमान माजल होता.. भुकेने डोक तडकत होत... तिने खाली उतरुन मग काही तरी खावुन परत जायच ठरवल... उतरताच पहिल्याच दुकानात गरम गरम समोसे बनत होते... ती गेली... एक प्लटे समोसे घेतले आणि खायला बसली.. पहिला घास घेताच.. चार छोटी छोटी अर्धी नागडी मुल आली... आणि ताई खुप भुक लागली आम्हला द्या ना म्हणु लागली... भुक तर तिलाही खुप लागली होती पण तिला त्यांची खुप किव आली.. तिने लगेच त्यांना अर्धे अर्धे वाटुन दिले.. आता तिच्या कडे फक्त ४० रूपये उरले होते.. ३८ रूपये गावा पर्यन्तची तिकीट होती.. आता मोठा प्रश्न होता... बस यायलाही खुप वेळ होती... 

विट्ठल नामाचा जप चोहीकडन तिच्या कानावर आदळत होता.. घंटेचा आवाज तिच्या डोक्याची नस तडकवत होता... सकाळ पासन अन्नाचा एकही कण पोटात नसल्याने तिला अजुन चिडचिड होत होत... बसची वाट बघत ती तिथेच बसली... तेवढ्यात एक आजोबा हातात एका कागदी प्लटेमध्ये साबुदाना खिचडी घेवुन आलेत.. खिचडीचा खमंग सुवास चोहीकडे दरवळलेला होता.. त्यांच्या गळयात तुळशी माळ होती, पांढराशुभ्र सदरा, लाल भडक फेटा.. चेहऱ्यावर त्यांच्या कमालीच तेज होत.. बघताच त्यांनी मन मोहणार स्मित हास्य दिल.. ती ही हसली.. ते म्हणाले..


“बाई... हे घे घासभर परसाद.”...


“नको आजोबा... मला नको”..


“देवाच्या परसादाले कोणी नाही मणते का..? घे मार बक्का”...


आजोबांच्या आग्रहास्त तिने एक घास घेतला... खाताच तृप्त झाल्याचा भास झाला.. त्या खिचडीची चव तोंडभर फिरू लागली....

“बाई कस तुरुपत झाल्या वाणी वाटते... हाय ना.. ह्न्न्न्न्न्न्न या पांडुरंगाचा महिमा अजब आहे... दर्शन घेवुन ये”...

“नको आजोबा माझी बस आहे”...

“अव माझी माय आता रातच्यानच बस येईन.. येर हाय अजुन. तु तवरीक ईट्ठल रुखमाईच दर्शन घेवुन ये.. आज त्यायचा दिस आहे.. रुकमाईच माहेर घर व्हय बाई हे आलीच हाय तर माथा टकुन घे”...

    आजोबा ख़ुद आग्रह करु लागले.. पण तीच घोड नाही वरच अडल होत....


  टाळ-मृदंगांच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामाच्या गजरात पूर्ण गाव गजबजलेल होत...

     तिन तास होवुन गेले... तिच्या भुकेच्या सीमेचा अंत होण्यास आला होता.... जवळपास दिवस बुडायला आला होता... आपोआप तिचे पाऊल देवळाच्या दिशेकडे वळले... विट्ठल नामाच्या गजराने पुर्ण कौंडण्य नगरी दुमदुमली होती... जशी जशी ती जवळ जात होती तस तसा गजर आणखीन स्पष्ट ऐकायला येत होता.. तिचेही ऒठ आता हलू लागले होते.. विट्ठल नाम गावु लागले होते... बरयाच दिवसांनंतर तिने देवळात पाऊल ठेवले होते.. मूर्ति बघताच तिच उर भरुन आल.. आपल्या मनातील संपूर्ण द्वेष-मत्सर देवापुढे व्यक्त करुन तिने मन हलक केल... ढसाढसा रडु लागली.. डोळे बंद करुन ती आपल्या आईची प्रतिमा अनुभवत होती.. तिला अचानक भास झाला की तिची आई मागुन आली आणि तिच्या पाठीवरन हात फिरवला की काय.. ती एकदम दचकुन उठली... मूर्तित तिला तिच्या आई ची छटा दिसु लागली.. तिच मन खुप प्रसन्न झाल.. जणु आईच भेटली की काय...विट्ठलाला साष्टांग नमस्कार करुन... हातात प्रासादाची खिचडी घेवुन.. ती निघाली.. मन भरुन अगदी तुडुंब भरलेक होत.. ती खुप आनंदी होती.. विठोबा आणि पोटाबा करुन मन व पोट दोन्ही तृप्त झाले होते... 

  परत बस स्थानकावर आली... थोडयाच वेळाने बस आली... ती परत रूमवर आली आणि येताच धा धा रडत कांचनला मिठी मारली.. ती एकदम घाबरली..

“ऐ मृदु काय झाल ग... सगळ ठीक तर आहे ना.. सकाळच्या गोष्टी साठी please मला माफ़ कर...”


“कांचु तुच मला माफ़ कर ग..!!! मी तुला नाही समजु शकले.. नेहमी माझच रडगाण गात बसले”..


“नाही ग... अस नको म्हणु... पण काय झाल हे तर सांग ना..?”..


 तिने घडलेला सगळा प्रकार तिला सांगीतला... कांचन खुप आनंदी झाली.. दोघींनी मिळुन विट्ठाची पुजा आर्चा केली... नामस्मरण केले...निरनिराळे उपवासाचे पदार्थ बनवुन फराळाचा नैवेध्य केला..... नकळत विट्ठलाने स्वतःच मृदुलाकडन उपवास घडवुन घेतला... 


———————————————————-

  मैत्रीनींनो आपला देवावर विश्वास असो किंवा नसो तो नेहमीच आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो... आपल्या भक्तांना तो स्वतःकडे खेचत आणतो आणि कळत नकळत दर्शन देतो... 

     आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी चे अनन्यसाधारण महत्व आहे.... आषाढ महिन्यातील एकादशी ही फार पवित्र मानण्यात येते. याला महाएकादशी असे म्हणतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी लांबचा प्रवास करुन पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीदनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्तार भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात. सर्व वारकरी टाळ-मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी-सुना, आया-बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत, आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. आषाढी एकादशीचा दिवस हा पवित्र दिन. या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खुप लोक पंढरपुरला येऊन निस्वार्थ भावाने जनसेवा करतात. विठ्ठल भकतीरच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपुरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी...


एकादशी, एकादशी। जया छंद अहर्निशी

व्रत करी जो नेमाने। तथ वैकुंठाचे पणे

नामस्मरण जाग्रण। वाचे गाय नारायण

तोचि भक्त सत्य याचा। एका जनर्दन मने वाचा...


Rate this content
Log in