वेळेवर हजर रहा
वेळेवर हजर रहा
सगळे उद्या मिटिंगला वेळेवर हजर रहा, छान तयारी झाली आहेच मिटिंगची व प्रेजेंटेशन ची..
सगळे तसे खुश होते, सगळ्यांनी परत एकदा कॅलेंडर बघीतले, तर मिटिंग काही दिसत नाही, एक दुसर्याला विचारतो अरे उद्या किती वाजता मिटिंग आहे?
प्रत्येक जण आपापली कॅलेंडर बघता पण मिटिंगचे आमंत्रण आज दिसत नाही, काय झाले करत सर्व जण संगणकाचे घड्याळ बरोबर सेट केले कि नाही ते बघत होते.
एकाच्या मिटिंग कॅलेंडर मधे ते दिसले तर भारतीय प्रमाणे वेळ उद्या सकाळची २:३०वाजता!
परत कुजबुज सुरू झाली, ही काय वेळ आहे का मिटिंग ठेवायची, अॉन साईटवाले वाटेल तेंव्हा आपल्या मनाप्रमाणे मिटिंग ठरवता व मग आपण अॉफशोअर वाले मिटिंगला हजर रहात नाही म्हणून तक्रार करतात.
आपण असे वागले तर चालेल का?
ये तुला आठवता का, काही वर्षा पुर्वी आपल्या मॅनेजरने घड्याळ कसे वाचायचे ह्यावर लेक्चर घेतले होते तर सगळ्यांनी त्याची टर उडवली होती कारण तो अगदी भास मारत, सगळ कस मलाच येत असे समजुन स्वतःच हसु करून घेतले होते!
अमेरिकेतलेच तर लोक ३-४ वेगवेळ्या टाईम झोन मध्ये असतात, घड्याळ जरी साध, महागडे असले तरी वेळ प्रत्येकाच्या घड्याळात त्यांच्या टाईम झोन प्रमाणे सेट करावी लागेल!
पंचतारांकीत हॉटेल मध्ये, कॉर्पोरेट अॉफिसेस मध्ये मोठ मोठी ७-८ घड्याळ लावलेली असायची व त्या घड्याळा खाली जगातल्या शहरांची नाव!
शाळेत जरी वेगवेळ्या देशातील वेळ व आपली भारतीय वेळ यातील फरक शिकले असेल तरी मग विसरून गेलो!
आता परत ते वेग वेगळ्या देशातील वेळेचे गणित आपल्या घड्याळ्याच्या काट्यावर कस बघायच हे शिकत आहे !!
मनातल्या मनात मिटिंगची वेळ दोघांच्या सोयीने भारतीय वेळे प्रमाणे किती वाजता ठेवायचे याची मेल पाठवण्यास संगणका समोर बसलो, मिटिंग कॅलेंडरमध्ये बघीतले व संध्याकाळची भारतीय वेळे नुसार ६वाजताची वेळ सगळ्यांसाठी योग्य आहे! हे मेल मधे लिहिले व पाठवले!
हे काय आपले घड्याळ्यातील वेळ निट नाही, रेडियो, टिव्हीवरच्या बातम्या सांगण्याच्या आधी भारतीय प्रमाण वेळ सांगतात या प्रमाणे आपले घड्याळ सेट करायचे आहे!! चला चला उठा घड्याळ्याची वेळ नीट करायची वेळ झाली! उद्यावर ढकललेली मिटिंगला आता सर्वजण वेळेवर हजर राहु!
