Meena Kilawat

Others

2  

Meena Kilawat

Others

वैशाख-वणवा

वैशाख-वणवा

2 mins
9.1K


     वैशाखवणवा हा प्रकृतीचा अविभाज्य असे एक अंग आहे. तो पृथ्वीचा मित्र आहे, पण हाच वैशाखवणवा मात्र माणसाला अगदी त्राही-त्राही करुन सोडतो. भयानक आग उगाळतो, सर्वांना कसा नकोसा असतो. सूर्य जणू पृथ्वीवर कोपलेला असतो व रागाने प्रचंड आग उगाळत असतो. या वैशाखवणव्यात सर्व होरपळून निघतात. सर्व मानव, पशू, पक्षीं सर्वांचा उष्णतेने थयथयाट होत असतो. वृक्षवल्ली पण जळून खाक होण्याच्या मार्गावर असतात. पाण्याची पातळी कमी झालेली असते. कुठेकुठे पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. समुद्र, नद्या, नाले, तळे सर्व आटण्याच्या मार्गावर असतात. कूलर, एसी पण कार्य करत नाहीत. तेंव्हा जनमानस पावसाची विनवणी करतात.पावसाची चातकासारखी वाट बघत असतात. पावसासाठीची आतुरता शिगेला पोहोचत असते,

मेघाकडे दयाद्र नेत्राने बघत असतात. यानिसर्गाच्या किमयेने मनुष्य, पशु, पक्षी मोठ्या आशेने बघत असतात. ऋतुचक्र फिरत असते. ऋतुचे अनेक रंग प्रकृतीत दडलेले आहेत. त्यात हा वैशाखवणवा वाखाणण्याजोगा आहे असे मला वाटते. 

       वर्षभरातीलबदलत्या ऋतुचक्राची अनेक कार्य आहेत. ती सर्व आपआपली कार्य चोखपणे करीत असतात. मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होत असते म्हणजेच चैत्र महिन्यापासून तर पौष महिन्यापर्यंत असते. थोडक्यात चैत्र महिन्या पासून ऋतुचक्राची नोंद घ्यावीशी

वाटते. केवळ बदलत्या निसर्गाचे वर्णनच नाही तर या बदलत्या ऋतुचक्राचे मानवी मनावर उमटणारे भावतरंगही आश्चर्य करण्यासारखे असतात. म्हणजे

हा निसर्ग मानवी सृष्टीलाही कसा प्रफुल्लित, उत्कर्षित करत असतो. शिवाय मनाला आनंदाची पर्वणी ही कशी वेळोवेळी मिळत असते. मनाला भुरळ घालनाऱ्या या ऋतुचक्राचे जितके कौतूक केले तितके कमीच असते वैशाखवणव्यात त्या रणरणत्या उन्हातही आपली कामे

सुरुच असतात. स्त्रीयांच वाळवण, साठवण, किंवा शेती तयार करणे, शेतकऱ्यांच बी बियाणे तयार करणे. पाऊस येणार असल्याची चाहूल गलबलून आंनद देणारी असते.आता फक्त पावसाची वाट बघणे एवढेच असते. मृग लागलाय आता पाऊस यायलाच हवा! मनाची तळमळ शिगेला पोहचते. पण वैशाखवणव्यातून बाहेर निघून श्रावणात जाणे म्हणजेच सासूरवाशिणीचा सासुरवास नाहीसा होवून ती माहेरवासी झाल्यासारखी सुखी होणे असते.

       तोआनंदाचा दिवस उगवतो. मृग नक्षत्रात घननिळा मनाचा राजा येतो. कधी लपडांव खेळतो तर कधी अस्तव्यस्त करुन सोडतो. कधी ओथंबून येतो तर कधी दुरुनच भूरळ पाडतो. आणि या जनजीवनाला आल्हाददायी सुगंधात मोहून टाकतो या हव्याहव्याश्या पावसाच्या धारा कोसळू लागल्या की सारी सृष्टी चिंबचिंब भिजून निघते. सुगंध हवेत पसरतो. सर्व जनामनास सुखावून जातो. कधी अविरत पावसाचे नृत्य पाहून सारं शिवार डोलत. पशुपक्षी गायन करतात. पण हा दिवस कसा येतो, हे आपण विसरून जातोय.  खरच वैशाखवणवा नसता आला तर कां आपल्याला आषाढ, श्रावण भोगायला मिळाला असता? नाही नां! मग वैशाखवणव्यावरही आषाढ, श्रावणासारख प्रेम करावं! काही काळाचा पाहुणाच नां तो! तस सर्वच ऋतू पाहुणेच असतात. आपण या ऋतूचक्रावरच जीवन

जगतो आहोत.यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत!


Rate this content
Log in