ऊब घराची...
ऊब घराची...


प्रत्येकाने कधी जगलेलं
एक मनस्वी स्वप्न
घर असावं...तर
दिलखुलास हसतं-खेळतं
हौशीनं बाहेरून
सुशोभित केलेलं सुंदर घर
आतल्या खोल्यांच्या
चार भिंतींचं नाही फक्त
आपुलकीच्या मायेनं
दिलेला मुलामा तो
अभिमानाने वेळोवेळी
करायचा सुगंधी
अंगणात सडा जणू
रसाळ नात्यागोत्यांचा
रांगोळीतले रंग त्यातला
अकल्पित गोडवा
आपल्या माणसांच्या
आनंदाचं आकर्षक तोरण
सुख-दुःखांच्या फुलरूपी
माळांनी सजलेलं
निखळत्या हास्यानं
भिंतीत जीव ओतणारं
घर एकजुटीने एकत्रित
बांधणारं अर्थसंकल्प