उभारी ध्यासाची...
उभारी ध्यासाची...

1 min

580
स्वप्नांच्या वेड्या पंखांना
असतेच उंच भरारी
नव्या दिशेच्या आशयाचा
नवा मायना उभारी
मुठीत जग जिंकल्यापरी
ध्यास ध्येयाचा ध्यानीमनी
आपल्याच स्पंदनांच्या
हाकेचा आर्त मानकरी
पाठीशी हात आपल्यांचे
नि प्रेरणेच्या आधाराचे
घास पुढ्यात सहज ठेवणे
होते काव्यांचे नि स्वप्नांचे