Gauri Ekbote

Others

2  

Gauri Ekbote

Others

तत्व : एक वास्तविक स्थिति

तत्व : एक वास्तविक स्थिति

2 mins
3.1K


स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व .... ह्याला gender दृष्ट्या न बघता थोडा  विचार केला तर जाणवलं कि हे तत्त्व प्रत्येकात असत . पुरुष हे हळवे , काळजी घेणारे आणि कणखर असतात , तसेच एक स्त्री सुद्धा कणखर ,परिस्थितीशी खंबीर तेने लढा देणारी आणि तेवढीच हळवी असते. मुळात हि तत्त्व आहेत ती सगळी कडे असतात अगदी पशु पक्षी झाड वेलीत सुद्धा , प्रत्येकात हे  असतंच आणि म्हणूनच ती व्यक्ती माणूस म्हणून जगत असते , नुसतं एक तत्त्व घेऊन आपण जगू शकतो पण त्याला खऱ्या अर्थाने जगणं नाही म्हणू शकत त्याला जेव्हा दुसऱ्या तत्त्वचि साथ मिळते तेव्हा तो पुरुष होतो , म्हणजे माणूस होतो .

मुळात जर अगदीच स्पेसिफाई करायचं तर आपला मेंदू हा विचार करतो , तुलनात्मक अभ्यास करतो निर्णय घेतो हे पुरुष तत्त्व आणि आपलं मन हे भावनिकता दर्शवत ते प्रेम , आपुलकी , राग व्देष , अश्या सगळ्या भावना त्याला समजतात , परिस्थिती च गांभीर्य हे जस मनाला जाणवत तर ह्या परिस्थिती तुन मार्ग कसा काढायचा हा विचार मेंदू करतो .

पण आपण ह्या गोष्टी कडे तेवढ्या विस्तारात्मक दृष्टीने न पाहता त्याला संकुचित बनवतो आणि तेच बरोबर हे धरून चालतो . आणि ह्या विचारातूनच पुरुषप्रधान जग स्त्री प्रधान जग , नारी शक्ती निर्माण होत आणि वाद वाढत जातात . माणसाला माणूस म्हणून बघितलं तर ह्या सगळ्याची काहीच गरज नाही. जसे एका स्त्री ला जगताना काही अडचणी येतात काही परिस्थिती ला समोर जावं लागत तसेच एका पुरुषाला सुद्धा कठीण परिस्थितीच्या विळख्या ला सोडवावे च लागते . स्त्री आणि पुरुष ,,,,,, ह्यात बऱ्याचदा स्त्रीला झुकत माप असत ह्याची बरीच कारण पण आहे .ह्या झुकत्या मापामुळे कधीकधी एखादा चांगला , हुशार , हळवा पुरुष दाबला जाऊ शकतो , त्याच पूर्ण आयुष्यच बदलू शकत , त्याच्या साठी होत्याच नव्हतं सुद्धा होऊ शकत ह्याचा कुणी विचार करू शकत का ? ... कोणत्या तरी मूवी मध्ये ऐकलेलं एक संभाषण आठवत कि दर वेळेला स्त्री च बरोबर असते असं नाही , दोन्ही बाजू चेक केल्या पाहिजे . एखादा पुरुष जर स्त्री ला मारत असेल तर आपण म्हणतो कि निर्दयी आहे , आणि एखादी स्त्री जर पुरुषाला मारत असेल तर म्हणतो कि नक्की ह्यानेच काहीतरी केलं असेल . हे वैश्विक आहे सगळे ह्याच प्रकारे विचार करतात आणि आपली मत बनवतात , पण असं नसत पुरुष सुद्धा बरोबर असू शकतो ,

असच काहीस घडलं माझा एक मित्र अभि बरोबर , आमच्या ग्रुप मधला अभि म्हणजे एकदम happy-go-lucky ,बोलण्या बाबत खुप बिनधास्त , कुठलाच विचार करायचा नाही , जे समोर येईल तस स्वीकारायचं अश्या स्वभावाचा , कुठलीही भीड़ भाड़ नाही, तेव्हढाच तो मनाने साधा , सरळ  अणि निर्मळ , आई वडिलांचा एकुलता एक त्यामुळे लडात वाढलेला पण लाड डोईजड नव्हते , तेव्हढाच समंजस पण होता. कॉलेज च शेवटच वर्ष आम्ही खूप मस्त एन्जॉय केल , आम्हाला सगळ्यांना campus interview मधून छान नौकरी पण लागली।  , अभी सुद्धा एका लिमिटेड कंपनी  मध्ये Purchase Assistant म्हणून join झाला। सुरुवातीला छान चार आकडी पगार होता , त्याचे बाबा खूप खुश होते कि मुलगा कमावता झाला , वर्ष खुप मस्त गेल सुट्टी च्या दिवशी आम्ही सगळे जमायचो कॉलेज ग्राउंड वर , मस्त धमाल यायची। मज्जा असायची . त्या दिवशी असच जमलो असताना अभिला फोन आला , आई ला अचानक छातीति दुखायला लागल म्हणून लगेच दवाखान्यात नेल , तो माइल्ड अटॅक होता।  योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाल्या मुळे , धोका टळला. बइपास सर्जरी  झाल्यावर त्या घरी आल्या ,

आता त्यानी एकच गोष्ट धरून ठेवली ती म्हणजे अभी च लग्न , सुरुवातीला अभी नव्हता तयार, काकुंच्या तब्बेति कड़े बघून तो तयार झाला.   तो तयार आहे हे बघून लगेच घाइत काकुनी मुलगी बघितली अणि लग्न लावल  , त्यांचा उद्देश्य एकच होता की माझ आता काही खर नाहीं , आहे तोपर्यंत अभिच लग्न अणि मुल बघितली कि मग जे होईल ते होवो.

मुलगी मुंबई ची दिसायला अतिशय सुन्दर , अभी पेक्षा जास्त शिकलेली होती , अभिला तर दीपिका पहिल्या क्षणीच आवडली , एरवी कुठल्याही मुली कडे न बघणारा अभी दीपिका कडे पाहतच होता ,आम्हाला वाटल की ती नाही म्हणेल पण तिच्याकडून पण होकार आला , अणि मस्त धूम धडाक्यात लग्न झाल.

अभी अणि दीपिका सुरुवातीच पहिल वर्ष सणवार करत संपल. ह्या वर्षात अभी ला कायम जाणवत होत कि दीपिका आपल्यात असून नसल्या सारखीच , तो कितीदा तरी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण करत होता पण ती विषय टाळायची , तिने ह्या एका वर्षात एकदाही अभिला तिच्या जवळ नाही येऊ दिल , अभिला थोड ते विचित्र वाटल पण कदचीत सगळ नवीन असल्यामुळे आणि arrange marrange असल्यामुळे ती अशी लाजल्या सारखी असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केल , तिने सगळ्यात मिसळाव अस अभिला कायम वाटे पण दीपिका कायम अलिप्त राहत होती .

ऑफिस मधे अभी च्या responsibility त वाढ झाली होती तो आता सीनियर परचेस मैनेजर झाला होता।  दीपिका मात्र कुठे तरी नाराज होती तिला अभिच बिनधास्त, मनमोकळ  वागण नव्हत आवडत ,   दीपिकाला, ती जस म्हणेल तस वागणारा ,तीच ऐकणारा नवरा हवा होता अभिला दीपिका आवडत होती , आणि  आई बाबां वर पण त्याच तेवढच प्रेम होत।  दीपिकाला त्याच अणि त्याच्या आई च एकमेकांशी बोलण सुद्धा पसंद नव्हत , तिच्या मता प्रमाणे  आई ने पाहिले तिला सांगयच, मग ती अभी ला सांगेल , जमेल तस - जमेल तेव्हा , आठवेल तेव्हा , ह्या पद्धतीने जर नाहीं झाल अणि आई जर डायरेक्ट अभीशी बोलली तर मात्र दीपिकाचा  जाम संताप होत असे,  अभी  आईचच ऐकतो , असा ती कंगवा करि , शेजारीपाजारी जावून सगळ्यांना उलट सुलट सांगे , पण सगळ्यांना आई चा स्वभाव माहित होता .... आई अभी सारखीच मनमिळाऊ आणि शांत होती , त्यामुळे कुणी तीच बोलन मनावर नव्हत घेत ,

दीपिका मुंबई university मधून MBA  केलेल , पण नौकरी करायची तिची अजिबात इच्छा नव्हती , ती घर कामात ही मदत नव्हती करत, आई काम करून दमुन जात असे , दीपिकाला टीवी वरच्या वेग वेगळ्या सेरिअल्स अणि मूवी बघण्यात आवड होती , अणि संध्याकाळी शॉपिंग। शनिवार रविवार outing अस दीपिका चा क्रम असे आणि ह्यात काही कमी पडल किंवा जर एखादे वेळी अभी नाही बोलला तर भांडण , एके दिवशी असच month end आणि दीपिकाला गोवा जायचं होत ती अभी कडे पैसे मागत होती आणि तू हि चल म्हणून मागे लागलेली , आई ची तब्बेत जरा आज खराब वाटत होती म्हणून अभी सुटी काढून घरीच होता , आदल्या रात्री पासून दीपिका त्याच्या मागे लागली होती चलच म्हणून , अभी ची अजिबात कुठे जायची इच्छा नव्हती , कस तरी त्याने तिला पैसे दिले ते घेऊन घरातील परिस्थिती न बघता दीपिका गोवा तिच्या मित्र मैत्रिणीन बरोबर निघून गेली , आई ला खूप वाईट वाटत होत , तीला अभी ची आता काळजी वाटायला लागली होती , लग्नाला दोन अडीच वर्ष झाली आणि पाळणा हलायची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती उलट वाद आणि भांडण वाढतच होत , शेवटी त्या दिवशी आई ने ह्यावर एक उपाय म्हणून अभी ला दुसर घर घेऊन रहा म्हणून सुचवलं कदाचित त्यामुळे ती बदलेल .... अभी ला ते मान्य नव्हत, पण बाबा हि ह्या गोष्टीला सहमत होते म्हणून त्याच area मध्ये ३-४ बिल्डींग सोडून एक flat अभिने विकत घेतला ह्यात दीपिका च्या आई वडिलांनी सुद्धा काही पैस्याचा  share दिला आणि दीपिका अभी तिथे राहू लागले , सुरुवातीला दीपिका खुश होती पण आठ दिवसातच ती परत पहिल्या सारखी झाली आता तर ती खूपच बिनधास्त झाली घरात खायला हि काही करायची नाही कि अभी कडे लक्ष द्यायची नाही , संध्याकाळी अभी दीपिकाला लपून आई बाबांकडून जेऊन घरी जात होता. असेच २-३ महिने गेले , वैवाहिक सुख अस अभी ला माहितच नव्हत , त्याच्या बरोबर लग्न झालेल्या आमच्या एका मित्राला एक मुलगा आणि एक मुलगी होती , त्यांना बघिल्यावर अभिला मनातून खूप वाटे आपल पण मुल असत तर आज ते एवढ असत , मनातून तो खूप कुढत होता . दीपिका मात्र तिच्या life मध्ये गुंग होती तिला अभी कळतच नव्हता ,

एके दिवशी संध्याकाळी बाहेर भटकून येताना दीपिकाने अभी ला  आई कडून निघताना पाहिलं , तू तिथे का गेला होता ,म्हणून विचारू लागली अभी ने काही उत्तर च दिल नाही मग दीपिकाला अजूनच जोर वाढला , ती रात्रभर अभी शी भांडत होती , आज जे तिला हव होत ते ती बोलून गेली ते म्हणजे divorse , दिपिकला अभी बरोबर आता नव्हत राहायचं तिला divors हवा होता , तिला अजून मोकळीक हवी होती , गळ्यातल् मंगळसूत्र तिला आता एक लोढण , वाटू लागल होत , तिला एक मोकळ , कुठलीही आडकाठी नसलेलं , कुठलीही जवाबदारी नसलेले , कुणी विचारणार नाही अस life हव होत , अभी , अभीच घर त्याच नाव तिच्या नावापुढे जोडन त्याच आडनाव हि तिला आता जड जात होत , तिला तिच्या आई बाबा बरोबर देखील नव्हत राहायचं , तिच्या आई ने तिला खुपदा समजून सांगितल पण दीपिका आता कुणाचही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती , तिला तीच आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचं होत आणि त्या साठी तिला divorse हवा होता .

सगळ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण दीपिका समजाऊन घेण्याच्या मनःस्थिती तच नव्हती तिला तीच च खर करायचं होत , अभी पण आता कंटाळा होता शेवटी त्यानेच निर्णय घेतला आणि दीपिकाला divorse देऊन मोकळ केल . खर बघता जेव्हा त्याने दीपिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता पण ते एकतर्फी च राहील , त्याच हळुवार प्रेम दीपिकाला कळलच नाही .

ज्या दिवशी divorse वर सह्या झाल्या त्या दिवशी दीपिकाने पुण्यातला तो flat जो अभी ने वेगळा घेतला होता तो स्वतच्या नावावर करून घेतला , लग्नात तिच्या आई बाबांनी घातलेले आणि अभी च्या आई ने दिलेले सर्व दागिने तिने तिच्या काडे घेतले ,लग्नात मिळालेले सगळ तिने अभी कडून मागून घेतल .

आता अभी आई बाबां बरोबर राहत होता सुरुवातीचे ३-४ महिने त्याला सावरण्यात च गेले . त्याने खूप मनापासून दीपिकावर प्रेम केल होत आणि ती सगळ विसरून तो flat विकून निघून गेली होती .

आई ला वाईट वाटत होत कि आपण खूप घाई केली अभिच्या लग्नाची , पोराच नुकसान झाल ... ह्याच मनःस्थिती त्या होत्या . पण २ वर्ष नंतर ते सावरले . .

आता अभी व्यवस्थित जॉब ला जातो , आमच्यात येतो मनसोक्त गप्पा मारतो. पण लग्न ह्या गोष्टी वरून त्याचा कायमचा विश्वास उडालाय...


Rate this content
Log in