टेली स्मार्ट
टेली स्मार्ट
"कोणी उचलून न्या रे ह्याला मघासपासुन गुरगुरतोय आणी त्या आवाजाने माझा जीव वर खाली होतोय"
" हे तू गुरगुरण बंद करु शकत नाही का?"
" नाही मी वायब्रेशन मोड वर आहे जो पर्यंत मी जर्नल मोड वर येत नाही तो पर्यत गुरगुरणार "
"काय आज कालचे तुम्ही घाबरवता आम्ही बाबा असे नाही आहोत "
"अहो गेले तुमचे दिवस आता आमचं राज्य आहे आणी तुमचे अस्तित्व धोक्यात आहे कधीही तुम्हाला डिस्कनेक्ट करुन टाकतील सांगता येत नाही"
"हे विसरु नको की एक काळ आमचा होता. एस टी डी म्हणजे दुरच्याना जवळ आणणारा धागा होता एक रुपयात पण बोलुन जायचे पण आता किती ते रिचार्ज करायचे पडते" "अहो तुम्ही फक्त बोलण्यासाठी होता आम्ही अख्ख जग एका बोटावर फिरवतो मग तेवढी किंमत मोजावी लागणारच आणी तुमच्यासारखी कंटाळवाणी वायर नाही आम्हाला आम्ही सहज कुठेही पोहोच शकतो म्हणून तर सगळ्यांच्या हातात दिसतो"
"हो का आमचा कोडलेस भाऊ आहे म्हटलं बिन वा
यरचा"
"गेले ते दिवस राहिल्या तुमच्या आठवणी"
"जुनं ते सोनं असतं विसरु नकोस"
"हा हा आता स्मार्ट फोन लागतो तुम्ही कुठे आमचे किप्याड पूर्वजाना पण आता कोणी विचारत नाही मग तुम्ही कुठे आता अँड्रॉइड चालतो तुमच्या सारखा डब्बा नाही "
डब्बा कोणाला डब्बा म्हणतो मला ह्याच डब्याने कधी सुखाचे दुःखाचे संदेश पोहोचवले आहेत तू अशील रे स्लिम मला डब्बा म्हून नकोस कळलं का "
"हो कळलं हा "
"हा आता कसला आवाज"
"काही नाही माझी बॅटरी लो झाली आहे पटकन मला चार्जिंग ची गरज आहे"
"आमचं आपलं बरं ना ती बॅटरीची झंझट आम्ही फक्त डिस्कनेक्ट झालो की सायलेंट बंद झाला वाटत आवाज नाही तो आला मोठा स्मार्ट म्हणणारा
"पण एक गोष्ट मात्र त्यांनी खरी बोलली ह्या घरात माझं अस्तित्व कधी डिस्कनेक्ट करतील. सांगता येत नाही बघुया घणघणतीत वाजेन की अडगळीच्या खोलीत असेन की ह्या घरातील छोट्या दोस्ताचं खेळत बनेल.."