तोच टेंभा पुन्हा पुन्हा....
तोच टेंभा पुन्हा पुन्हा....


एक आर्त हाक फक्त माणुसकीच्या मदतीची असते
जेव्हा संगळं जग कसं गाढ झोपेत असतं
रक्तरंजित इतिहासाचं पान मात्र कोरच राहतं
जेव्हा एक बलात्कारी निरपराध देह जळतो
आशेच्या नजरेपल्याड आपला कि परका
कळण्याआतच नराधम शांत जीव कुरतडतो
तेव्हा चूक नक्की होती कोणाची तिची कि त्याची
जग फक्त तात्पुरता एक ठपका ठेऊन संपवतं
जळालेला मृतदेह राखायला कॅण्डल मार्च निघतो
अनेक सज्जनांमधला निर्दयी तेव्हा झाकतो
पोपटपंची कागदोपत्री कायदा तेवढा काय तो नाचतो
न्यायाचा तराजू कोण पेलणार प्रश्न हवेत डोलतो
सहानुभूतीची सोशल मीडियावरची वायफळ चर्चा
न संपणारी अविवेकी विकृत असते निराशा
जगापल्याड नजरेआड गेलेल्या निष्पाप जीवाला
अंधकार मिटवणाऱ्या नव्या पर्वाची मात्र आहे आस
बेरंग जीवनातला बेधुंद बेमुरादी रंग शोधायला
का फक्त देहाचाच डोलारा बोलका वाटावा ?
कपाळमोक्ष झालेल्यांना का जात पात अडथळा नसावा ?
लाजिरवाण्या मानेला काय नातीगोती नसावीत ?
न्यायासनाकडे आशेने पाहणाऱ्यांची इथे वानवा
कायदा हातात घेणाऱ्यांचा मोठा जयघोषांचा जलवा
भावनिक समाजाचा प्रतिक्रियांचा निर्णयांती मुरडा
असमाधान्यांचा समाधानी होऊ पाहणारा सल्ला
जेव्हा जखमा नव्याने पुन्हा पुन्हा चिघळतात
तेव्हा त्यांना बहुढंगी नाटक नुसतं कुरवाळायचं
जेव्हा होत्याचं नव्हतं केव्हाच होऊन जातं काळोखी
तेव्हा कायद्याचं रामराज्य तेवढं मात्र आठवायचं
मात्र सुकलेल्या त्या जखमा न भरताच मिटतात
अश्रू पुसणाऱ्यांचं तेवढं मूर्त रूप जखमी दिसतं
देखावा रावण देहाचा तेव्हा बरी वाट चाखतो
न संपणाऱ्या घटनांचा नवा टेंभा पुन्हा मिरतो