STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

3  

Neelima Deshpande

Others

थोर कवी विंदा करंदीकर

थोर कवी विंदा करंदीकर

1 min
259

"पोस्टमन ! नीलिमाच्या नावाने पत्र आहे."


अशी गर्जना करीत माझ्या हातात पत्र टेकवत पोस्टमन काका पत्र वाटायला कॉलोनीत गेले सुद्धा, तरी मी दारातच अवाक होऊन उभी होते. कुसुमाग्रज, बालकवी,वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि ज्यांचे अनेक कवितासंग्रह मी वाचून काढले होते ते लाडके कवी विंदा करंदीकर ! त्याकाळात छंदच जडला, एकाच कवीची ठरवून मिळतील तितकी सगळी पुस्तके वाचून त्यातल्या आवडत्या निवडक कविता एका वेगळ्या बनवलेल्या वहीत उतरवून घ्यायच्या.

तेच वाचलेल्या कथा आणि कादंबरीचे. आवडलेले विचार,परिच्छेद एका डायरीत नमुद करायचे, वारंवार वाचायचे...प्रसन्न होत आपणही असे सुंदर लिहावे ठरवत मग त्या लेखकाला आणि कवीला पत्र पाठवून पुस्तक आवडल्याची पोच पावती-आनंद कळवायचा. 

पत्राच्या उत्तराची अपेक्षा नसल्याने विंदांनी खास उत्तर पाठवल्याचा मनापासून आनंद झाला.


Rate this content
Log in