Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meena Kilawat

Others


1.8  

Meena Kilawat

Others


थांबला तो संपला

थांबला तो संपला

3 mins 10.4K 3 mins 10.4K

     'थांबला तो संपला' खरच आहे.ज्या व्यक्ती यशस्वी आहेत,त्यांच्याकडे वेळ नसतो.कारण ती व्यक्ती वेळ खर्च करीत नसतात,तर ती व्यक्ती वेळेची गुंतवणूक करीत असतात.त्याचप्रमाणे वेळेची गुंतवणूक करणारे व्यक्ती धनलाभापेक्षा ही अधिक पटीत यश संपादन करत असतात.

      तसेच ज्या व्यक्ती बेकार असतात,त्याच्याकडे ही वेळ नसतो,मात्र ते ही कुठेतरी फालतू कामात खर्च करत असतात.चांगल्या कामासाठी खर्च केलेला वेळ

लगेच आपणास फळ देत नाही,परंतू तो रबरी चेंडूसारखा उंचीवर पोहचवण्याची क्षमता निश्चितच ठेवत असतो.

      'अमेरिकेची विल्मा रुडोल्फ' लहान असतांना नऊ रोगांनी ग्रस्त होती.तिला निट चालतासुद्धा येत नव्हते.खेळण्याची आवड असूनसुद्धा ती खेळू शकत नव्हती.मात्र ती खचली नाही.तिने आधी वेळेचे नियोजन केले.सुरवातीला चालण्याचे नियोजन केले.सर्वांगात होणाऱ्या वेदना सोसून तीने चालण्याचा सराव केला.पण नियोजन ढळू दिले नाही. आराम कधी केला नाही. परिवारांची,समाजाची तिला पूर्ण सहानुभूती असुनसुद्धा,स्वत:चे करियर खेळामध्ये करण्याचे तिने ठरवले .ते अति अशक्य वाटणारे वास्तव तिने आयुष्यात आपले ध्येय बनवले.साधारण मनुष्य कामावरुन आल्यावर थकलेल्या स्थितीत असतो.तेंव्हा  सकाळी लवकर उठणे त्याला जिवावर येत असते. पण विल्मा रुडोल्फ मात्र त्याला अपवाद होती.तिच्या आयुष्यात कंटाळा नव्हताच.तिला कोणी पहाटेला उठवलसुद्धा नाही.शारीरिक त्रासाकडे तिने कधीच लक्ष दिले नाही.सातत्याला पाठीशी घेवून ती सतत वाटचाल करीत होती.व्यायामामध्ये वेळेची गुंतवणूक करीत गेली. आणि त्याचे तिला फळही मिळाले.

      १९६०च्या रोम ऑलिंम्पिकमध्ये तीन सुवर्णपदक तिने जिंकले.जगाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.अफाट यश संपादन केले.तिने सुंदर आपल्या कार्याचे नियोजन व वेळेची गुंतवणूक पद्धतशीर करुन,उंचांक गाठला,व आपल्या आयुष्यात ध्येयाला महत्व दिले.आणि अशक्य वाटणारे कार्य करून सिद्धिस नेले.ती जर जागेवर खिळली असती तर.? किंवा आपल्या स्वास्थाला घेवून बसली असती तर.? ती उंच भरारी घेवू शकली असती कां.? म्हणुन म्हणतात, 'थांबला तो संपला'...

        अशीच एक अजून आपल्या अपंगावर मात करुन दिल्लीत कॉमनवेल्थ गेममध्ये आलेली मुलगी. 'डँनिएल ब्राऊन' फक्त २२ वर्षाची होती.भारतात आली असतांना तिला व्हीलचेअरवर बसुनच आणलेली होती. तिला उभ रहायला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत असे. तिला अजीबात चालता येत नव्हते. एका असाध्य रोगाने तिच्या पायाला अपंगत्व आले होते.तीरंदाज 'डँनिएल ब्राऊन' तिने ही वेळेची गुंतवणूक करुन आपली वाट शोधली.याच डँनिएलने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पीकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिंंम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून आपल्या देशाचे नाव उंच केले. तिने सांगितले होते की,"रोज सकाळी उठल्यावर पायात असंख्य वेदना होतात.सराव हा रोजच करायचा असतो.आता मला वेदनेची सवय झालेली आहे परंतू मी वर्तमान काळात जगते भूतकाळ ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे;पण कालपेक्षा आज मी चांगला परफॉर्मेंस करते.माझ्या वेदनेनेच मला मानसिकरीत्या कणखर बनवले आहे. जिद्दीने कोणत्याही बाबीवर विजय मिळवता येतो. आणि अशक्य काहिच नाही. सराव, लगन,मेहनत,करुन आपण जग जिंकू शकतो".

     कित्येकांनी तिच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले,व चुकीची माहिती दिली,पण ती ठाम राहीली.ज्याचे ध्येय व स्वप्न ठरलेले असते. आणि जीद्द असते अश्या व्यक्तीला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. म्हणून जे काम तुम्ही हाती घेतले ते पूर्ण करण्याकरीता समूळ शक्तिनिशी प्रयत्न करावा.अपयशाची भीती सुद्धा जवळ येवू देवू नका. केवळ यशाचा आणि यशाचाच विचार करा.तुम्ही जसे तुम्हाला पाहता तसच तुम्ही घडत जाता. " बायबलमध्ये ही म्हंटले आहे.हेच हार्वर्ड विश्वविद्यालयाचे मानसशास्त्रज्ञ डॉ जेम्स यांनी ही म्हंटल आहे.आणि हेच जगप्रसिद्ध मनोचिकित्सक एमिली एच.कैंडी यांनी ही म्हंटल आहे.

    "कशी ही परिस्थिती आली तरी तिच्यावर मात करण्याची हिंमत अंगी असणे आवश्यक आहे".विल्मा रुडोल्फने चालण्याचा प्रयत्न केला नसता ,तर ती 'ऑलिंम्पिकमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवू शकली नसती'.आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवण्याची आणि आवश्यकते नुसार त्याचा योग्य वेळी योग्य वापर करणे गरजेचे आहे.आणि 'एक गोष्ट लक्षात असू द्यावे जो थांबला तो संपलाच समजा '


Rate this content
Log in