अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

तेराव्याची सेल्फी

तेराव्याची सेल्फी

3 mins
569


झोपताना आजकाल एक वाईट सवय लागली आहे. झोपायच्या आधी पलंगावर लोळत, व्हाट्सअॅप, एफबी मेसेजेस बघणे.  

हाताच्या अंतरावर मोबाईल ठेवणे.. मेसेज आल्याचा ट्ण आवाज आला की पहिले मेसेज बघायचा..


काही दिवसांपुर्वी असाच एक मेसेज आला.. तेरावीच्या कार्यक्रमाला जाऊन आल्याबद्दलचा, त्यातल्या 'सेल्फी काढली' ह्या वाक्याने नंतर एफबीवर बरीच वेगवेगळे मत वाचकांचे आले.

 

खर तर आता सेल्फी काढणे काही नवीन प्रकार राहिला नाही... सुखात, लग्न कार्यात फोटो काढले जातात.. आलेल्या पाहुण्यांबरोबर...


तसेच दुःख कार्यात एकत्र आलेल्या पाहुण्यांचे फोटो काढले तर काही हरकत नाही. असे मला वाटते ..आजकालच्या धा़वपळीत कोणाला वेळ मिळेल नंतर एकत्र येण्याचा... फोटो 'टॅग' केलेलेही बरे... कोण जाणे कोण्याच्या जाण्याने तीन-चार पिढ्या एकत्र आल्या असतील...


माझी सेल्फी काढणे चालु झाले थोड्या वेगळ्या अर्थाने... रात्री जवळपास 12 वाजता आलेला मेसेज मलाही बैचेन करून गेला... उशिरा कधी झोप लागली कळले नाही.. प्रत्येक गावाच्या, समाजाच्या प्रथा वेगळ्या... एकत्र कुटुंबपद्धती नसल्यामुळे, व बाहेर गावी असल्यामुळे कोणाच 'मरण' जवळून पाहिले नव्हते...


माणसाने प्राण सोडल्याबरोबर त्याची 'बॉडी' होते...

जवळचे वाटणारे लांब पळतात, उगाच झंझट मागे लागु नये म्हणुन... 

तर काही माझेही कोणी लागत या कर्तव्य भावनेने नंतरच्या कर्मकांडात सामील होतात शेवट पर्यंत.


कोणी उगाच भांडण लावण्याच्या निमित्याने मानपानासाठी अडुन बसतात...


दुःखात सहभागी होण्याचे निमित्त समोर करून आता यांचं कसं होणार हा चिंतेचा सूर दाखवत मनात आनंद व्यक्त करतात...


परंपरेच्या नावाखाली बऱ्याच नकोश्या गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतात... आपल्यालाच कश्या सगळ्या परंपरा, आपल्या घराण्याचे रितीरिवाज माहीत आहे, असे करत उगाच मोठमोठ्याने बोलत शांततेची वाट लावतात... त्यांना दूर करावे तरी ... आम्ही मोठे, आम्ही मोठे करत चिटकून राहतात... कोण काय बोलले ह्याचे सर्व रेकॉर्डींग त्यांच्या छोट्या मेंदुत साठवलेले असते...


बाई 'विधवा' झाली करत खोटे रडत... तिच्या अंगावरचे दागिने बळजबरीने ओरबाडुन काढतात...कुंकू लावू नको, मंगळसुत्र, हिरवा रंगाची साडी घालु नकोस...शिकल्या सवरल्या बायका ह्यात पुढाकार घेत आपले संस्कार दाखवतात...


आधीच आपलं माणुस 'गेलं' म्हणुन हळवी झालीली 'ती', ह्या नको असलेल्या गर्दीत कसे बसे तेरा दिवस त्या गराडात घालवते...


दुःख 'ती'चे 'ती'लाच सहन करायचे असते...


'पुरुष' मरण पावला तर 'ती'च्या माहेरच्यांनी खर्च करायचा असतो, भावाने काही विधी करायच्या असतात, सख्खा नसेल तर चुलत वैगरे...बहिणींने केलेले नाही चालत...


दाहव्याला टाॅवेल टोपी द्यायची कि तेराव्याला ह्यात ही त्यांचे वाद. आमच्या कडे असे आणि तुमच्याकडे तसे...


टाॅवेल टोपी देतांना ती कोणी व कोणा कोणाला द्यायची? ह्याचीपण एक प्रथा... आता तंबाखु कोणी खात नाही.. पण प्रथा म्हणुन तो दाता खाली चाऊन,दुःख मिटल करून खायचा...

'ती' च्या माहेरकडच्यानी,भावाने 'ती'च्या तीन पिढ्यांच्या पुरूष मंडळींना प्रथम कपाळाला काळा बुक्का लावायचा, डोक्यावर टोपी, टोपी पण ठरलेली, गांधी टोपीच, व खांद्यावर टॉवेल टाकायचा व हात जोडुन आमच्या बहिणीला नीट सांभाळा अशी विणवनी करायची...


टॉवेल टोपी चे दुकानेही ठरलेली, ह्या कार्यक्रमात लागणारे टॉवेल टोपी, मान म्हणुन घ्यायचा-द्यायचा असतो, नंतर त्याचे काय करायचे? ते घालण्या सारखेपण नसतात, वापरतापण येत नाही...

इकडे पुरुषांचा टाॅवेल टोपी कार्यकम झाला कि मग बायकांचा साडी चोळी देण्याचा कार्यक्रम... ह्यातही मानपान... पहिले कोणाला व कसे...

देण्या घेण्याच्या साड्या, ब्लाऊज पिस असे दिले जातात की परत ते वापरता येत नाही... आलेल्या ह्या गोष्टी दुसर्यांना पुढे ढकलण्यासाठी ठेवुन देतात किंवा आधाराश्रम वैगरेमधे दिल्या जातात.


बर्याच गावात, समाजात ही टाॅवेल टोपी, साडी, ब्लाऊज पिस देण्या घेण्याची प्रथा बंद करून त्या कुटुंबाला कसली गरज आहे हे ओळखुन मदत केली जाते.


काही प्रथा बंद केल्या तरी काही नविन प्रथा समोर येतात...

'डिजीटल फ्लेक्स', बॅनर, पेपर मध्ये, मोठी फुल पेज, हाफ पेज 'भावपुर्ण श्रद्धांजली' ची बातमी.


सोशल मिडियावर मेसेजेस.. व त्यावरून होणारे ज्ञान..


आता सामाजिक परिस्थिती बदलत आहे, प्रत्येकाच्या गरजा बदलत आहे. ऐखाद्याचा मृत्यु सोहळा शांतपणे पार पडावा व त्यांच्या कुटुंबाला योग्यसाथ देऊन मदत करावी, मदत कोणत्याही स्वरूपाची असु शकेल. असेच आता तेराव्यात सामील झालेल्या नातेवाईकांनी वागले पाहिजे असेच चित्र माझ्या 'तेराव्याची सेल्फी' ने काढल्या गेले.


Rate this content
Log in