Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

सवत

सवत

2 mins
313


   " कुठे ही अवदसा भेटली अन माझ्या संसाराचं वाटुळं करायला निघाली . पण मी काय कमी हाय व्हय . मी कशी हार मानेल कसा माझा हिसका दाखविला .

     

 काय पुटपुटत आहे सुनंदा आज राहुल सोबत भांडण झाल की काय ,असे बोलत रेणुका आत आली .

    

 तू व्हय रेणुका . ये बैस आज कसं येन केलं .

 इकडे मार्केट मध्ये आली होती. वाटलं तुला भेटून घ्यावं .

 हल्ली कामामुळे वेळ मिळत नाही ग सारखी धावपळ असते .


  हो ना ! चहा घेत दोघीच्या गप्पा रंगल्या .


   अग सुनंदा तू कोणाबद्दल बोलत होती ग कोणती अवदसा तुझ्या संसाराचं वाटोळं करत होती .


   काय सांगू तुला माझ्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली आणि दोघांच्या मध्ये ती आली .

   ती कोण ग !

  

   " सवत " आहे माझी

  सवत शब्द एकताच रेणुका स्तब्दच झाली. कस शक्य आहे सुनंदा काय बोलते हे . राहुल तर शांत आणि समजूतदार आहे. तो कधी चुकीचं वागणार नाही .नेमकं काय झाले ते सांग .


    एक दिवस राहूल उशिरा घरी आला . त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता .विचारले असता त्याने सांगितले आज मित्राचा वाढदिवस होता .त्यामुळे आम्ही सर्व पार्टी करत होतो . पार्टीत ती पण भेटली . त्यामुळे पार्टी जास्तच रंगली व घरी यायला उशीर झाला .


   मला वाटले खुप दिवसानंतर सर्व मित्र मैत्रीण एकत्र भेटले त्यामुळे उशीर झाला म्हणून मी पण दुर्लक्ष केले .


     पण नंतर काही दिवसाने त्यांच्या भेटी वाढल्या .मित्राच्या प्रत्येक मैफिलीत ती हजर असायची कधी कधी ती ऑफिस मध्ये पण जायची . नंतर ते एकांतात भेटायला लागले . रोज रात्री राहुल उशिरा घरी येत .तिचा तो सुगंध लपविण्यासाठी तो वेगवेगळे परफ्यूम वापरायला लागला .


   मला त्या गोष्टीचा खुप त्रास व्हायचा. तिला भेटण्यास मी त्याला विरोध करायची पण तो ऐकत नव्हता . छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद करायचा .


    तो तिच्यासाठी खुप पैसे खर्च करायचा मी काही बोलले तर म्हणायचं तिच्या शिवाय मी राहू शकत नाही .मी तिला सोडणार नाही .


   हे ऐकून मला भीती वाटायची आता माझ्या संसाराचं काय होईल .मी कुठे बाहेर गेली की तो तिला घरी घेऊन यायचा .


    मी विचार केला आता याला रंगेहाथ पकडायचे . सुट्टीचा दिवस होता मी बाहेर जायचे निमित्त करून शेजारच्या ताई कडे जाऊन बसली व पूर्ण लक्ष घराकडे ठेवले . तो बाहेर गेला व थोडया वेळाने तिला घरी घेऊन आला .व डायरेक्ट रूम मध्ये घेऊन गेला .मी त्याच्या पाठोपाठ घरी आले व रूम मध्ये गेली तर बघते काय!


   तो तिला तोंड लावून होता तो तिच्यात इतका मग्न झाला होता की मी तिथे आली तेही कळले नाही .

  ते बघून मला खूप संताप झाला . मी तशीच त्याच्याकडे गेली व हाताने ओढून तिला बाजूला केले व बाहेर आणून तिला बाहेर फेकली तशी त्याची नशाच उतरली .


Rate this content
Log in