स्वसिद्धतेची परीक्षा....इच्छा
स्वसिद्धतेची परीक्षा....इच्छा
स्वतःला सिद्ध करण्याची परीक्षा
अनपेक्षित जीवघेणी फार
अंत पाहणारे निष्ठुर क्षण
निरंतर खेळवत राहणारे
ओझं नसेल वाटत तरीही
तणावाची जाणीव सततची
विसावणारा खडतर प्रवास
yle="background-color: rgba(255, 255, 255, 0);">एकांत कधी न मिटवणारा
अंधारातूनी निश्चयी वाटचाल
पूर्णत्वाची जणू परिकल्पना
दूरदृष्टीला व्यापक दृष्टिकोनाची
उस्फूर्त विश्वासू मिळावी साथ
स्वसिद्धतेची स्वप्नपरी इच्छा
एकदातरी व्हावी पूर्ण